छातीतील वेदनांवरून तुम्ही तुम्हाला हार्ट अटॅक आला आहे की नाही हे ओळखू शकतात. छातीत कुठे वेदना होत आहेत, किती वेळ आणि त्याची तीव्रता किती, यावरून तुम्ही तुमच्या छातीतील वेदना हार्ट अटॅकच्या आहेत की नाही ते ओळखू शकता.
Heart Attack : एकदा हार्ट अटॅक आल्यानंतर पुन्हा येऊ नये म्हणून काय करायचं?
advertisement
कार्डिओलॉजिस्ट डॉ. रजनीश कुमार पटेल यांनी छातीतील वेदना हार्ट अटॅकच्या आहेत की नाहीत हे ओळखण्यासाठी काही लक्षणं सांगितली आहेत.
...तर हार्ट अटॅक नाही
खूप छोट्या जागी वेदना
वेदना वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत.
15-20 सेकंदात संपणाऱ्या अशा खूपच कमी वेळ वेदना
चालण्याफिरण्याने आणि भारी काम केल्याने वेदना होतात, आराम केल्यानंतरही त्यात फरक पडत नाही त्या तशाच राहतात.
Heart Attack : हार्ट अटॅकची 6 विचित्र लक्षणं, जी फक्त महिलांमध्येच दिसतात
मान, खांद्यात वेदना आणि त्यासोबत सुन्नपणा, मुंग्या आल्यासारखं वाटणं. हे सर्व्हाइक स्पॉँडियालटिसचं लक्षण असू शकतं.
तिखट खाल्ल्यानंतर छातीत जळजळ, वेदना, उलटी, आंबट ढेकर, पोट फुगलेलं हे गॅस किंवा अॅसिडीटीचं लक्षण आहे.
...तर छातीतील वेदना हार्ट अटॅकची
छातीच्या मोठ्या भागात वेदना ज्या खांदा, मान, जबड्याकडे गेल्या आहेत.
चालण्याफिरण्याने, भारी किंवा मोठं काम केल्याने वेदना होतात, वाढतात आणि आराम केल्यानंतर कमी होतात.
भीती, थंड घाम, श्वास फुलणं, कमजोरी, चक्कर येणं, हृदयाचे ठोके वाढणं.
छातीत जळजळ, छाती भारी भरल्यासारखी वाटणं, छातीवर दाब आल्यासारखं वाढणं, चालण्याफिरण्याने वेदना वाढतच जाणं, आराम केल्याने कमी होणं.
हार्ट अटॅकच्या वेदना किती वेळ असतात?
सिनीअर कार्डिओलॉजिस्ट डॉ. के. नरसा राजू यांनी सांगितलं की, हार्ट अटॅकच्या वेदना 10 ते 15 मिनिटं असतात. तासभरही होऊ शकतात. एका तासापेक्षा जास्त वेळ छातीत वेदना होत असतील तर जास्त गंभीर आहे. हे हृदयाच्या आजाराचं लक्षण आहे. पण 5 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी एक मिनिट, काही सेकंदच छातीत वेदना होत असतील तर त्या हृदयाशी संबंधित नाहीत.