जेव्हा जेव्हा आपल्या शरीराच्या धमन्यांमध्ये काही प्रकारची समस्या उद्भवते तेव्हा यामुळे आपले हृदय ऑक्सिजन युक्त रक्त पुरवू शकत नाही. या समस्येमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदय शरीराला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा योग्य प्रकारे करू शकत नसेल, तर पोटात अनेक प्रकारचे रासायनिक बदल घडून येण्याची लक्षणं दिसू शकतात.
Heart Attack : हा ब्लड ग्रुप असेल तर येऊ शकतो हार्ट अटॅक, तुमचा रक्तगट तर नाही ना तपासा
advertisement
1. पोटदुखी : काही रुग्णांमध्ये या समस्येदरम्यान तीव्र पोटदुखीची समस्या देखील असू शकते. पोटदुखीत तीव्र वेदना होत असतील तर त्याचा संबंध हृदयविकाराशी असू शकतो. जेव्हा तुमच्या हृदयाला योग्य रक्तपुरवठा होत नाही, तेव्हा शरीरातील रक्त परिसंचरण थांबते आणि नंतर पोटात आम्लता वाढते, ज्यामुळे पोटदुखी होते.
2. अपचन आणि ढेकर : हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अपचन आणि ढेकरही रुग्णाला येतात. जर तुम्हाला सतत अपचन आणि ढेकर येत असेल तर हे हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण असू शकतं. काही रिपोर्ट्सनुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अपचन आणि ढेकर येण्याची समस्या जास्त असू शकते. इतकंच नाही तर रुग्णांना मळमळण्याची समस्या देखील असू शकते. जर तुम्हाला ही समस्या असेल तर ते गांभीर्याने घ्या.
3. अतिसार आणि उलट्या : आतड्याला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळे किंवा समस्या आल्याने तुमच्या आतड्याला रक्तपुरवठा होण्यात अडथळा येतो, त्यामुळे रुग्णाला उलट्या आणि जुलाबाचा त्रासही होतो. असं म्हटलं जातं की जेव्हा आपल्या शरीरातील धमन्यांमध्ये अडथळा येतो तेव्हा पोटाचा त्रास होतो.
Heart Attack : शरीराच्या या भागातून घाम हृदयासाठी धोक्याची घंटा, येऊ शकतो हार्ट अटॅक
जर तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या झपाट्याने होत असेल तर नक्कीच ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. या समस्या कोणीही हलक्यात घेऊ नये. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी, जर तुम्हाला तुमच्या पोटाशी संबंधित लक्षणांसह या समस्या येत असतील, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
डोकं हलकं वाटणं किंवा चक्कर येणं
थंड वातावरणातही भरपूर घाम येणं
थकवा आणि अशक्तपणा
उलट्या आणि मळमळांसह पोटदुखी
छातीत दुखणं आणि श्वास घेण्यात अडचण
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही. तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)