Heart Attack : शरीराच्या या भागातून घाम हृदयासाठी धोक्याची घंटा, येऊ शकतो हार्ट अटॅक

Last Updated:

Heart attack symptoms sweating : माहितीनुसार हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरातून घाम येणं यामागे शास्त्रीय कारण आहे. अशावेळी कोणत्याही ऋतूमध्ये घाम येऊ शकतो.

News18
News18
नवी दिल्ली : हार्ट अटॅक म्हटलं की फक्त छातीत वेदना होणं हे लक्षण सगळ्यांना माहिती आहे. पण इतर लक्षणांसोबत हार्ट अटॅकचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे घाम येणं. तुम्ही म्हणाल, घाम तर आपल्याला इतरवेळीही येतो. पण हार्ट अटॅक येताना शरीराच्या एका विशिष्ट भागातूनच घाम येतोय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हार्ट अटक येण्याची शक्यता असताना शरीराच्या कोणत्या भागातून जास्त घाम येतो.
हल्ली आपली जीवनशैली खूप व्यस्त आणि तणावपूर्ण झाली आहे. काम घरून असो किंवा ऑफिसला जाऊन करण्याचे असो. कामातील वाढत तणाव कोणासाठीही कमी झालेला नाही आणि यामुळे सध्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचे आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. हृदयविकारामुळे तरुणांनाही जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे हार्ट अटॅकची लक्षणं तुम्हाला माहिती असायला हवीत.
advertisement
हार्ट अटॅकची मुख्य लक्षणं
छातीत अचानक दुखणे
जबड्यापर्यंत छातीत दुखणे
छाती जड झाल्यासारखे वाटते
अचानक हृदयाचे ठोके वेगवान होणे
दम लागणे
अचानक जास्त घाम येणे
थकवा, ऊर्जा कमी होणे
चक्कर येणे
हार्ट अटॅक येण्यापूर्वी घाम का येतो?
माहितीनुसार हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरातून घाम येणं यामागे शास्त्रीय कारण आहे. अशावेळी कोणत्याही ऋतूमध्ये घाम येऊ शकतो. असं घडतं कारण, जेव्हा आपल्या धमन्यांमध्ये प्लाक तयार होतो आणि ऑक्सिजन हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीर घाम सोडतं.
advertisement
हार्ट अटॅकपूर्वी शरीराच्या या भागातून येतो घाम
इतरवेळी व्यायामानंतर, उन्हामध्ये किंवा शारीरिक कष्टानंतर आपल्याला हातांच्या खाली आणि पाठीवर जास्त घाम येतो. मात्र जेव्हा आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते तेव्हा आपला चेहरा, मान आणि कपाळावर जास्त घाम येतो. यासोबतच तळहात थंड पडणे आणि त्याला घाम येणे हेदेखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack : शरीराच्या या भागातून घाम हृदयासाठी धोक्याची घंटा, येऊ शकतो हार्ट अटॅक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement