पाळीदरम्यान, महिलांना अनेकदा अस्वस्थ वाटतं आणि त्रासही जाणवतो. हीटिंग पॅड आणि औषधं हे पर्याय आहेत त्यासोबतच एक पेय पाळीतील वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. आलं, दालचिनी, गूळ, पाणी हे साहित्य यासाठी आवश्यक आहे.
Manifestation : शाहरुखसारखी 'शिद्दत' म्हणजेच मॅनिफेस्टेशन का ? वाचा सुपर टिप्स
मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम देणारं हे पेय तयार करणं खूप सोपं आहे. यासाठी, एका पॅनमधे दीड कप पाणी घ्या, त्यात आलं आणि दालचिनी घाला आणि ते मंद आचेवर पाच-सात मिनिटं उकळवा. पाणी सुमारे एक कप झाल्यावर गॅस बंद करा.
advertisement
पाणी गाळून घ्या आणि थोडं थंड होऊ द्या. नंतर, आवडीनुसार गूळ घाला. गूळ घातल्यानंतर पाणी पुन्हा उकळू नका, कारण जास्त उष्णतेमुळे गुळातील पोषक घटक नष्ट होऊ शकतात.
हे पेय मासिक पाळीच्या एक-दोन दिवस आधी आणि पाळीदरम्यान पिणं चांगलं. पोटदुखी आणि पेटके कमी करण्यासाठी आणि आराम देण्यासाठी हे पेय खूप उपयुक्त ठरू शकतं.
Sesame Seeds : छोट्या तीळांची मोठी जादू, वाचा तीळ खाण्याचे जबरदस्त फायदे
आलं - आल्यामधे जिंजेरॉल असतं, यामुळे सूज कमी करण्यास आणि स्नायूंचा ताण कमी करण्यास मदत करते. म्हणूनच ते पेटके कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.
दालचिनी - दालचिनीमुळे गर्भाशयात रक्ताभिसरण सुधारतं, पेटके निर्माण करणाऱ्या प्रोस्टॅग्लॅंडिनचं संतुलन यामुळे राखलं जातं आणि पोटफुगी कमी करण्यासाठी हे पेय खूप उपयुक्त आहे.
गूळ - गुळात लोह आणि इतर खनिजं भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे उर्जेची पातळी वाढते. यामुळे सेरोटोनिन संतुलित होतं आणि स्नायूंना आराम मिळतो.
