त्वचेसाठी तांदूळ खूपच फायदेशीर आहे. यातले गुणधर्म त्वचा मऊ ठेवण्यासाठी, डाग कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. आज आपण तांदळाच्या तीन फेस पॅकबद्दल जाणून घेऊयात.
चेहऱ्याची हरवलेली चमक परत आणण्यासाठी तांदूळ आणि इतर जिन्नस वापरता येतात. यासाठी तांदूळ आणि दूध फेस पॅक, तांदूळ आणि दही आणि मध आणि तांदूळ असे कॉम्बो उपयुक्त ठरतील.
advertisement
Diwali : फटाक्यांच्या धुरापासून जपा, प्रदूषणामुळे तब्येतीवर होतो परिणाम
तांदूळ आणि दूध फेस पॅक - चमकदार आणि मऊ त्वचेसाठी तांदूळ आणि दूध वापरू शकता. दोन चमचे तांदूळ आणि एक चमचा दूध घ्या. एकत्र मिसळून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर समान रीतीनं लावा. यामधे तुम्ही गुलाबजल देखील घालू शकता. पंधरा ते वीस मिनिटं ही पेस्ट चेहऱ्यावर राहू द्या. चेहऱ्यावर ही पेस्ट थोडी चोळा थंड पाण्यानं धुवा.
तांदूळ आणि दही - या फेस पॅकसाठी, दोन चमचे तांदूळ आणि दही घ्या आणि ते पूर्णपणे मिसळून पेस्ट तयार करा. तुम्ही त्यात लिंबाचा रस देखील घालू शकता. चेहऱ्यावर एक मिनिट राहू द्या. ही पेस्ट वाळल्यानंतर, गालांना मसाज करा आणि चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा मऊ होईल आणि डाग कमी होतील.
Diwali : दिवाळी फराळाचा ओव्हरडोस पडेल भारी, या उपायांनी पोटाला मिळेल आराम
मध आणि तांदुळाचा फेसपॅक - मध आणि तांदुळाचा फेसपॅक बनवण्यासाठी, एक चमचा तांदूळ आणि दोन चमचे मध एकत्र करा. नंतर, दोन्ही चांगलं मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनिटं राहू द्या. पेस्ट वाळल्यानंतर, थंड पाण्यानं चेहरा धुवा. आठवड्यातून किमान दोनदा हा फेस पॅक लावल्यानं त्याचे परिणाम दिसतील.