पोटाची जळजळ त्वरित कमी करण्यासाठी आणि अल्सरसारख्या समस्या कमी करण्यासाठी काही पदार्थ उपयुक्त ठरतात. डॉ. शालिनी सिंग सोलंकी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओत या पाच गोष्टींचा उल्लेख केला आहे. यामुळे आम्लपित्त लगेच कमी होईल
मनुका मध - मनुका मध पोटासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. यातल्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे पोटातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात. अल्सर बरे करण्यास देखील याची मदत होते. मधामुळे छातीतली जळजळ आणि आम्लता या दोन्हीपासून आराम मिळतो.
advertisement
Face Pack : डेड स्किन काढण्यासाठी खास नैसर्गिक फेस पॅक, चेहरा येईल उजळून
कोबीचा रस - कोबीत आढळणारे ग्लूटामाइन हे संयुग पोटाच्या आतील आवरणाची दुरुस्ती करतं. आम्लामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी हा घटक उपयुक्त आहे. अल्सर बरे करण्यास देखील याचा उपयोग होतो.
दही - दह्यात नैसर्गिक प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात. आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना यामुळे बळकटी मिळते. यामुळे पचन सुधारतं आणि आम्लपित्त कमी होतं. जेवणानंतर एक वाटी ताजं दही किंवा ताक हे खूप प्रभावी उपाय आहे.
ज्येष्ठमध - ज्येष्ठमधात ग्लायसिरायझिन नावाचं संयुग असतं, पोटातील आम्लामुळे होणारी जळजळ यामुळे कमी होते. ज्येष्ठमध चघळल्यानं किंवा त्याचा रस प्यायल्यानं पोट थंड होतं आणि जळजळ कमी होते. अल्सरच्या रुग्णांसाठी देखील ते फायदेशीर मानलं जातं.
Drumsticks : शेवग्याच्या शेंगांचं सूप प्या, ठणठणीत राहा, वाचा सविस्तर
केळी - केळ्यांमधील सायटोएंडोक्राइन पेशी पोटात एक संरक्षणात्मक थर तयार करतात, ज्यामुळे आम्लाला पोटाच्या अस्तराचं नुकसान होण्यापासून रोखलं जातं. केळ्यांमुळे त्वरीत आराम मिळतोच पण आतड्यांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठीही केळी उपयुक्त आहेत.
अॅसिडिटीचा त्रास वारंवार होत असेल तर आहाराचा आणि जीवनशैलीत काही बदलांची गरज आहे का याचा विचार करा. मसालेदार, तळलेले पदार्थ खाणं टाळा तसंच बराच वेळ उपाशी राहणं टाळा. वर उल्लेख केलेल्या या पाच नैसर्गिक गोष्टींमुळे औषधांशिवायही पोटातील जळजळ आणि अॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळू शकतो.
