TRENDING:

Health Tips : हिवाळ्यात घ्या तब्येतीची काळजी, सर्दी, खोकला होण्यापासून जपा, या काढ्याची रेसिपी लक्षात ठेवा

Last Updated:

दररोज आलं, तुळस आणि काळी मिरीचा काढा प्यायल्यानं बंद झालेलं नाक लगेच उघडेल आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल. हिवाळा सुरु होईल तेव्हा या काढ्याची कृती लक्षात ठेवा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिवाळ्यात किंवा बदलत्या हवामानात सर्दी, खोकला आणि नाक बंद होणं ही लक्षणं दिसतात. नाक बंद झाल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. अनेकदा यामुळे डोकं जड होणं, झोपेचा त्रास होणं आणि दिवसभर चिडचिड होणं असा त्रास होऊ शकतो.
News18
News18
advertisement

श्वसनाचा त्रास, सर्दी या सगळ्यासाठी औषधं, इनहेलर किंवा नाकासाठीचे स्प्रे असतात, त्याचबरोबर काही नैसर्गिक आणि सोप्या उपायांनी यावर मात करता येते. दररोज आलं, तुळस आणि काळी मिरीचा काढा प्यायल्यानं बंद झालेलं नाक लगेच उघडेल आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल. हिवाळा सुरु होईल तेव्हा या काढ्याची कृती लक्षात ठेवा.

Teeth Care : दातांचा पिवळेपणा होईल कमी, दातांच्या स्वच्छतेसाठी चांगला पर्याय

advertisement

नाक बंद होण्याची मुख्य कारणं म्हणजे सर्दी, ऍलर्जी, धूळ, प्रदूषण किंवा विषाणूजन्य संसर्ग असू शकतात.

या काळात, आपल्या नाकातील श्लेष्मा सुकतो आणि साचतो. नाक बंद होतं, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

बंद नाक साफ करण्यासाठी काढा बनवण्यासाठी साहित्य:

एक कप पाणी, आल्याचा एक इंचाचा तुकडा किसून घ्या. तुळशीची पाच-सहा पानं, चार-पाच काळी मिरी,

advertisement

एक चमचा मध.

Nail Care : अस्वच्छ नखं दिसतील चकचकीत, या उपायांनी नखं होतील खोलवर स्वच्छ

काढा कसा बनवायचा -  एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळायला लागल्यानंतर त्यात आलं, तुळस आणि काळी मिरी घाला. मंद आचेवर पाच-सात मिनिटं उकळू द्या, जेणेकरून सर्व औषधी गुणधर्म त्यात मिसळतील. नंतर, गॅस बंद करा आणि मिश्रण गाळून घ्या.

advertisement

मिश्रण कोमट असेल तेव्हा त्यात एक चमचा मध घाला आणि ते प्या. हा काढा दिवसातून दोनदा, सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी पिणं फायदेशीर आहे. हा काढा दिवसातून दोनदा, सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिताय? शरीराला कसा होतो फायदा? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

या काढ्यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि सर्दीमुळे ब्लॉक झालेले सायनस उघडण्यास मदत होते. यामुळे श्लेष्मा सैल होतो आणि घशातील जळजळ कमी होते. वाफेमुळे नाकातील मार्ग साफ होतात, ज्यामुळे त्वरित आराम मिळतो. हा काढा दोन-तीन दिवस सतत प्यायल्यानं नाक साफ होईल शिवाय खोकला आणि घसा खवखवणं देखील कमी होतं.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : हिवाळ्यात घ्या तब्येतीची काळजी, सर्दी, खोकला होण्यापासून जपा, या काढ्याची रेसिपी लक्षात ठेवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल