ऊर्जा वाढवण्यासाठी नैसर्गिक काढ्याबद्दलचा एक व्हिडिओ आयुर्वेदिक डॉक्टर सलीम झैदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. हा खास तयार केलेला आयुर्वेदिक काढा पिणं अत्यंत फायदेशीर ठरू शकतं.
Kidneys : किडन्यांचं आरोग्य तुमच्या हातात, या सवयींत बदल करा, ठणठणीत राहा
काढा बनवण्यासाठी साहित्य - शेवग्याच्या शेंगा, अश्वगंधा आणि दालचिनी. हा काढा तयार करणं अगदी सोपं आहे. यासाठी, एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात एक चमचा शेवग्याच्या शेंगांची पावडर, अर्धा चमचा अश्वगंधा पावडर आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर घाला. हे मिश्रण सुमारे दहा मिनिटं उकळू द्या. पाणी उकळल्यानंतर ते गाळून घ्या आणि कोमट प्या. गोडपणासाठी तुम्ही मध किंवा गूळ देखील घालू शकता.
advertisement
बहुतेकांसाठी, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा काढा घेणं पुरेसं आहे. पण, ज्यांना तीव्र अशक्तपणा आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज काढा प्यावा.
सकाळी नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळी पाच-सहाच्या सुमारास काढा पिणं चांगलं. या वेळी ते पिऊ शकत नसाल तर रात्री झोपण्यापूर्वी देखील काढा पिऊ शकता.
तुम्हाला उच्च रक्तदाब, थायरॉईड किंवा हृदयरोगाचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काढा घ्या. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी देखील हा काढा पिणं टाळावं.
Eye Care : वाढत्या प्रदूषणाचा डोळ्यांना धोका, अशी घ्या डोळ्यांची काळजी
शेवग्याच्या शेंगा नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन म्हणून काम करतात. त्यात कॅल्शियम, लोह, प्रथिने, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई सारखे आवश्यक पोषक घटक असतात. शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी या घटकांची मदत होते.
अश्वगंधामुळे मज्जासंस्थेला आराम मिळतो. तणाव संप्रेरकांना देखील संतुलित करण्याचं काम यामुळे होतं. दालचिनीमुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि साखरेची पातळी राखली जाते.
या आयुर्वेदिक काढ्याव्यतिरिक्त, जर तुम्हाला त्वरित उर्जेची आवश्यकता असेल तर तुम्ही काही ऊर्जा वाढवणारे पदार्थ खाऊ शकता. अशक्तपणा दूर करण्यासाठी आंबा, मध, रताळं, बदाम आणि अक्रोड हे पदार्थ डॉक्टरांनी सुचवले आहेत.
