या फ्रिकल्समुळे चेहऱ्यावरच्या त्वचेचा रंगही एकसारखा दिसत नाही. यासाठी आयुर्वेदिक तज्ज्ञांनी घरगुती वस्तू वापरून फ्रिकल्स कमी करण्यासाठीच्या टिप्स दिल्या आहेत. यासाठी सर्वप्रथम, अर्धा टोमॅटो, दोन चमचे तांदळाच्या पिठात बुडवा आणि हा टोमॅटो संपूर्ण चेहऱ्यावर चोळा. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी निघून जातील, ब्लॅकहेड्स कमी होतील आणि चेहरा स्वच्छ होईल.
Spine : तासन्तास बसणं तब्येतीसाठी हानिकारक, अर्धचक्रासन करा, फिट राहा
advertisement
चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी आणखी काही जिन्नस उपयोगी आहेत. तांदळाचं पीठ, मुलतानी माती वापरुन तसंच बटाट्याचा रस, दही, हळद हे पदार्थ वापरल्याही डाग कमी होतात.
फेसपॅक बनवण्यासाठी, एका भांड्यात दोन चमचे तांदळाचं पीठ आणि एक चमचा मुलतानी माती घ्या. त्यात दोन चमचे दही घालून एक पॅक बनवा. हा तयार केलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा. आठवड्यातून एकदा हा फेस पॅक लावा. यामुळे डाग कमी करण्यासाठी मदत होईल.
Metabolism : चयापचय वाढवण्यासाठी योगासनं उत्तम, शरीराला मिळेल ऊर्जा आणि वजन राहिल नियंत्रणात
बटाट्याचा रस - बटाट्याचा रस देखील फ्रिकल्स कमी करण्यासाठी प्रभावी उपाय आहे. चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावण्यासाठी, प्रथम बटाटा किसून घ्या आणि नंतर त्याचा रस काढण्यासाठी तो पिळून घ्या. हा रस कापसाच्या मदतीनं चेहऱ्यावर लावता येतो. आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरल्यानं फ्रिकल्स कमी होऊ शकतात.
हळद दह्यात मिसळून चेहऱ्यावर लावता येते. हळदीत भरपूर औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे हळद त्वचेला उजळवते आणि डाग कमी होतात. तर दह्यामुळे त्वचेला एक्सफोलिएटिंग गुणधर्म मिळतात आणि त्वचेला मॉइश्चरायझेशन देखील मिळतं. चेहऱ्यावर काहीही लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.
