वयानुसार किती तास झोप आवश्यक आहे?
नवजात बाळ (0 ते 3 महिने)
या वयोगटातील मुलांना सर्वात जास्त झोपेची गरज असते. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी त्यांना दिवसातून 14 ते 17 तास झोप आवश्यक आहे.
लहान मुले (4 ते 12 वर्षे)
या वयोगटातील मुलांना अजूनही भरपूर झोप लागते. 4 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी 10 ते 13 तास तर 7 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी 9 ते 12 तास झोप गरजेची असते.
advertisement
किशोरवयीन (13 ते 17 वर्षे)
या काळात शारीरिक आणि हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे किशोरवयीन मुलांसाठी दररोज 8 ते 10 तास झोप आवश्यक आहे.
प्रौढ (18 ते 64 वर्षे)
या वयातील लोकांसाठी 8 तासांचा नियम बऱ्यापैकी लागू होतो, पण तज्ञांच्या मते, 7 ते 9 तास झोप घेणे पुरेसे आहे. हे प्रत्येकाच्या जीवनशैलीवर अवलंबून असते.
ज्येष्ठ नागरिक (65 वर्षांवरील)
या वयानंतर झोपेचा पॅटर्न बदलतो. त्यांना रात्रीची झोप कमी लागू शकते, पण एकूण झोपेचा कालावधी 7 ते 8 तास असावा. ते दिवसाही थोडा वेळ डुलकी घेऊ शकतात.
झोपेची गुणवत्ता महत्त्वाची
केवळ तासांची संख्या पुरेशी नाही, तर झोपेची गुणवत्ताही महत्त्वाची आहे. शांत, गाढ आणि अखंड झोप मिळाली तरच शरीराला पूर्ण आराम मिळतो. जर तुम्ही पुरेशी झोप घेऊनही दिवसभर थकलेले असाल किंवा लक्ष केंद्रित करू शकत नसाल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)