TRENDING:

Pregnancy : 42 व्या वर्षी आई होणार कॅटरीना कैफ: 'या' वयात गर्भधारणा किती योग्य, काय आहे धोका?

Last Updated:

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ सध्या चर्चेत आहेत. बातम्या आहेत की 42 व्या वर्षी त्या आई होणार आहेत. ही बातमी चाहत्यांसाठी आनंदाची असली, तरी एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो तो म्हणजे 40+ वयात गर्भधारणा सोपी आहे का, की धोकादायक?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pregnancy Difficulties : बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ सध्या चर्चेत आहेत. बातम्या आहेत की 42 व्या वर्षी त्या आई होणार आहेत. ही बातमी चाहत्यांसाठी आनंदाची असली, तरी एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो तो म्हणजे 40+ वयात गर्भधारणा सोपी आहे का, की धोकादायक? अनेकदा जेव्हा विषय गर्भधारणेचा येतो तेव्हा वयाचा विचार केला जातो आणि जास्त वयात बेबी प्लॅन करणं अनेकदा धोकादायक मानलं जात.
News18
News18
advertisement

“अॅडव्हान्स्ड एज प्रेग्नंसी” म्हणजे काय?

डॉक्टर 35 वर्षांनंतर होणाऱ्या गर्भधारणेला अॅडव्हान्स्ड माँटेर्नल एज म्हणतात. अमेरिकन कोलेज ऑफ American College of Obstetricians and Gynaecologists (ACOG) च्या मते या वयात आई आणि बाळ दोघांनाही गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. बेबी प्लॅन करताना नेहमीच वयाबद्दल चर्चा होते आणि अनेकदा डॉक्टरही याची काळजी घेण्यास सांगतात. अशा वेळेस जेव्हा 35 वयानंतर जेव्हा गर्भधारणा करायची असते तेव्हा अनेक कॉम्प्लिकेशन येतात मग IVF, सरोगेसी यांसारख्या मार्गाचाही अवलंब केला जातो.

advertisement

जगभरातील डेटा

WHO आणि UNICEF (2025) च्या अहवालानुसार, 2023 मध्ये दररोज साधारण 700 महिलांचा मृत्यू गर्भधारणा किंवा प्रसूतीतील गुंतागुंतींमुळे झाला. CDC USA च्या आकडेवारीनुसार, 40 वर्षांवरील महिलांमध्ये मातृ मृत्यूदर 59.8 प्रति 100,000 जन्म होता जो विशीतील किंवा तिशीतील महिलांपेक्षा अनेक पट जास्त आहे.

42 व्या वर्षी प्रेग्नंसीचे मोठे धोके

1. गर्भपात आणि स्टिलबर्थ

advertisement

35 वर्ष ओलांडल्यानंतर महिलांमध्ये अनेक हार्मोनल बदल होतात अशा परिस्थितीत जेव्हा 42 व्या वर्षी तुम्ही बेबी प्लॅन करता तेव्हा हा धोका अधिक पटीने वाढतो. अशा परिस्थितीत गर्भपात किंवा स्टिलबर्थ होण्याची शक्यता असते. NHS UK म्हणते की 40 वर्षांनंतर जवळपास 50% प्रेग्नंसी गर्भपातात बदलतात. RCOG UK नुसार, 40+ वयातील महिलांमध्ये 39 आठवड्यांवर स्टिलबर्थचा धोका 2/1000 असतो, तर 35 वर्षांखाली तो फक्त 1/1000 असतो.

advertisement

2. डाउन सिंड्रोम आणि जेनेटिक समस्या

गर्भधारणा ही कधीच सोपी नसते, या काळात शरीरात अनेक बदल होतात ज्यामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. डाउन सिंड्रोम आणि अनेकदा जेनेटिक समस्या देखील उद्भवतात. अशा परिस्थितीत वेळेत बेबी प्लॅन करणे गरजेचे असते. National Down Syndrome Society च्या मते, 40 वर्षांमध्ये डाउन सिंड्रोमचा धोका सुमारे 1% (1 in 98) असतो. ACOG सांगते की प्रत्येक वयातील महिलांना NIPT, CVS किंवा Amniocentesis सारख्या जेनेटिक चाचण्यांचा पर्याय मिळायला हवा.

advertisement

3. उच्च रक्तदाब आणि डायबिटीज

महिलांमध्ये अनेक बदल होतात, 30-35 वयानंतर अनेक आजारांनाही त्यांना तोंड द्यावं लागत. यामधील सर्वात सामान्य आजार म्हणजे हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीज.ACOG च्या अहवालानुसार, 40+ वयात गर्भावस्थेतील डायबिटीज आणि उच्च रक्तदाबाचा धोका 2–3 पट वाढतो. WHO देखील मान्य करते की गर्भावस्थेत हाय BP हा मातृ मृत्यूचा एक मोठा कारण आहे.

4. सी-सेक्शन डिलिव्हरी

सिझेरियन डिलिव्हरी म्हणजे योनीमार्गे नैसर्गिक प्रसूती शक्य नसताना, पोट आणि गर्भाशयावर शस्त्रक्रिया करून बाळाला जन्म देण्याची प्रक्रिया. काही विशिष्ट वैद्यकीय कारणांमुळे ही शस्त्रक्रिया केली जाते, जसे की बाळाची स्थिती योग्य नसणे, आईला काही आरोग्य समस्या असणे किंवा नैसर्गिक प्रसूतीमध्ये काही गुंतागुंत निर्माण होणे. सिझेरियन डिलिव्हरी ही आई आणि बाळ दोघांच्याही सुरक्षिततेसाठी केली जाते. ACOG च्या आकडेवारीनुसार, 40–44 वयातील जवळपास 47% प्रसूती सी-सेक्शनने होतात.

5. IVF आणि प्रजननाची खरी परिस्थिती

आजकाल IVF पद्धत देखील खूप प्रसिद्ध झाली आहे. अनेकदा जोडप्याला वय किंवा इतर कारणांमुळे बेबी प्लॅन करण्यात किंवा गर्भधारणेत अनेक अडचणी येतात. अशा परिस्थितीत लोक IVF चा विचार करतात. HFEA UK नुसार, 40–42 वयात IVF मधून live birth per embryo transfer फक्त 10% असते. 43–44 वयात हा दर आणखी कमी होऊन 5% राहतो. Cleveland Clinic सांगते की वय वाढल्यावर अंड्यांची गुणवत्ता आणि संख्या दोन्ही घटतात, त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने गरोदर राहणे अवघड होते.

कॅटरीना आणि 40+ महिलांसाठी शिकण्यासारखे मुद्दे

हेल्थ चेकअप आणि लाइफस्टाइल – ब्लड प्रेशर, शुगर, थायरॉइड कंट्रोलमध्ये ठेवा.

जेनेटिक टेस्टिंग – NIPT सारख्या टेस्टमुळे बाळाच्या आरोग्याबाबत लवकर माहिती मिळते.

रेग्युलर मॉनिटरिंग – RCOG गाइडलाइननुसार, 39–40 आठवड्यांवर लेबर इंड्यूस केल्यास स्टिलबर्थचा धोका कमी होतो.

मेंटल हेल्थ सपोर्ट – या वयात प्रेग्नंसीचा ताण जास्त असतो, त्यामुळे कुटुंबाचा आणि डॉक्टरांचा आधार खूप महत्त्वाचा आहे.

कॅटरीना कैफच्या प्रेग्नंसीची बातमी 40+ वयात आई होऊ इच्छिणाऱ्या अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. WHO म्हणते: “दर दोन मिनिटांनी एका महिलेचा जीव जातो आणि हे मृत्यू टाळता येऊ शकतात.” म्हणजेच योग्य मेडिकल मार्गदर्शन आणि वेळेवर टेस्टिंग केल्यास, 42 व्या वर्षीही आई बनणे शक्य आहे आणि ते सुरक्षितही ठरू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pregnancy : 42 व्या वर्षी आई होणार कॅटरीना कैफ: 'या' वयात गर्भधारणा किती योग्य, काय आहे धोका?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल