मेडिकल ऑफिसर डॉ. ऋतुजा सुरंजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाअंतर्गत महिलांच्या आरोग्यावर विशेष भर दिला जात आहे. पुरुषांचा देखील यात समावेश आहेच. शिबिरात बी.पी., शुगर, हिमोग्लोबिन (H.B.) अशा तपासण्या मोफत केल्या जात आहेत. तपासणीनंतर आवश्यक औषधे देखील मोफत पुरवली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
Health Campaign: महिलांसाठी गूड न्यूज! 20 प्रकारच्या आरोग्य तपासण्या अगदी मोफत, कुठे आहे सुविधा?
advertisement
याठिकाणी येताना आधार कार्ड सोबत आणावे. त्याशिवाय नोंदणी केली जात नाही. त्यामुळे याठिकाणी येताना आधार कार्ड सोबत आणून नोंदणी करावी. त्यानंतर पुढील उपचार केले जातात. याचबरोबर नवरात्राच्या कालावधीत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य तपासणीसह रक्तदान शिबिरालाही नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, अशी विनंती आहे.
अंबादेवी परिसरातील या शिबिराबरोबरच शहरातील विविध भागांत एक दिवसीय आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केले जात आहेत. त्याठिकाणी सुद्धा नागरिकांची भरपूर गर्दी बघायला मिळत आहे. 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' या अभियानांतर्गत महिलांचे आरोग्य सक्षम राहावे आणि कुटुंब सशक्त व्हावे, हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
नवरात्राच्या धार्मिक वातावरणात आरोग्य जागरूकतेचा उपक्रम राबवून महापालिकेने एक वेगळा संदेश दिला आहे. भक्तिभाव, सामाजिक उत्तरदायित्व आणि आरोग्यसेवा या त्रिसूत्रीमुळे अंबादेवी परिसरातील नवरात्रोत्सवाचे वातावरण अधिक मंगलमय झाले आहे. अमरावती महानगरपालिकेकडून अनेक असे उपक्रम राबविले जात आहेत. अशाच काही उपक्रमातून अमरावतीला स्वच्छ वायू सर्वेक्षण मध्ये मोठे बक्षीस मिळाले आहे.