Health Campaign: महिलांसाठी गूड न्यूज! 20 प्रकारच्या आरोग्य तपासण्या अगदी मोफत, कुठे आहे सुविधा?

Last Updated:

Health Campaign: या विशेष आरोग्य अभियानांतर्गत महिला आणि बालकांच्या आरोग्यावर भर दिला जाणार असून महिलांच्या 20 प्रकारच्या तपासण्या मोफत होणार आहेत.

Health Campaign: महिलांसाठी गूड न्यूज! 20 प्रकारच्या आरोग्य तपासण्या अगदी मोफत, कुठे आहे सुविधा?
Health Campaign: महिलांसाठी गूड न्यूज! 20 प्रकारच्या आरोग्य तपासण्या अगदी मोफत, कुठे आहे सुविधा?
ठाणे: सध्या देशभरात 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' हे आरोग्य अभियान राबवलं जात आहे. 7 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान सुरू असेल. या विशेष आरोग्य अभियानांतर्गत महिला आणि बालकांच्या आरोग्यावर भर दिला जाणार असून महिलांच्या 20 प्रकारच्या तपासण्या मोफत होणार आहेत. या अभियानात आयुष्मान भारत कार्डचीही नोंदणी केली जाणार आहे. जेणेकरून एखाद्या महिलेला गंभीर आजाराची लागण झाली तर तिला मोफत उपचार मिळावेत.
ठाणे जिल्ह्यातही जिल्हा आरोग्य विभाग आणि ठाणे महानगरपालिकेने हे आरोग्य अभियान हाती घेतली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' अभियानात महिलांची हाय ब्लडप्रेशर, डायबिटिस, कर्करोग तपासणी, क्षयरोग, ॲनिमिया आणि सिकल सेल स्क्रीनिंग, गरोदर मातांची तपासणी व समुपदेशन, लसीकरण सेवा, मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन आदींबाबत महिलांना माहिती देण्यात येईल. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्रसूतिगृह, ग्रामीण रुग्णालय, महापालिकेच्या रुग्णालयातही महिलांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.
advertisement
ठाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाची 17 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. या माध्यमातून स्त्रियांच्या आरोग्याला एक नवा आयाम मिळणार आहे. या उपक्रमामुळे स्त्रियांमध्ये आरोग्य विषयक जागरुकता वाढणार आहे. रोगांवर वेळेत उपचार मिळतील आणि प्रत्येक कुटुंबाला आरोग्याचं वरदान लाभणार आहे.
advertisement
आरोग्य अभियानाच्या कालावधीत रक्तदान शिबिर, लसीकरण आदींसह विविध स्वरूपाच्या आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जातं आहे. गरोदर स्त्रियांनी प्रसूतिपूर्व काळजी कशी घ्यावी, त्यासाठी कोणत्या तपासण्या करणे गरजेचे आहे, यासाठी देखील मार्गदर्शन केलं जाणार आहे. महिलांना त्यांच्या आणि बालकांच्या आहाराची माहिती दिली जात आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Health Campaign: महिलांसाठी गूड न्यूज! 20 प्रकारच्या आरोग्य तपासण्या अगदी मोफत, कुठे आहे सुविधा?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement