जाणून घ्या यामुळे होणारे आजार आणि त्यावरचे प्रतिबंधात्मक उपाय. कारण जास्त वेळ खुर्चीवर बसणं
आरोग्यासाठी हानिकारक आहे.
आजच्या डिजिटल युगात, प्रत्येक व्यवसायात, बहुतांश व्यक्ती खुर्चीवर बसून काम करतात. तुम्ही घरून काम करा
किंवा ऑफिसमध्ये, तुम्हाला सात ते आठ तास खुर्चीवर बसावं लागतं. तुम्ही जर जास्त वेळ खुर्चीवर
बसून काम करत असाल तर तुम्हाला कोणते आजार होऊ शकतात आणि कोणते उपाय आहेत
advertisement
ज्याद्वारे तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवू शकता.
Skin Care : चेहरा सतेज दिसण्यासाठी वापरा तांदुळाचं पीठ, 5 स्क्रब करतील जादू, आजच करा ट्राय
बराच वेळ खुर्चीत बसल्यामुळे होणाऱ्या समस्या-
1. मान दुखणं -
जास्त वेळ खुर्चीवर बसल्यानं पाठ आणि मान दुखू शकते. जास्त वेळ बसल्यानं पाठीच्या कण्यावर
दाब येतो.
2. खांद्यामध्ये वेदना -
जास्त वेळ खुर्चीत बसल्यामुळे खांद्यांमध्ये जडत्व येतं किंवा खांदे दुखतात.जी
काही काळानंतर कायमची समस्या बनू शकते.
आपट्याची पानं आहेत फारच गुणकारी, आयुर्वेदिक फायदेही आहेत खूपच, VIDEO
3. लठ्ठपणा-
जास्त वेळ बसल्यामुळे मानवी शरीरातील कॅलरीज बर्न होत नाहीत. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
4. ताण-
जास्त वेळ खुर्चीवर बसल्यानं मानसिक तणावाची समस्या निर्माण होऊ शकते. अनेकवेळा आपण
ऑफिसमध्ये कामातून सुट्टी घेऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो.
याचा शारिरीक थकवा जाणवू शकतो.
हे प्रकार टाळण्यासाठी काही गोष्टी करणं तुमच्या हातात आहे.
1 - ब्रेक घ्या -
काम करताना दर अर्ध्या तासाला 5 ते 10 मिनिटं ब्रेक घेतला पाहिजे. असं केल्यामुळे
थकवा कमी होईल आणि शरीरातील रक्ताभिसरण नियमित राहील.
2. योग्य खुर्ची निवडा-
तुम्हाला सात ते आठ तास खुर्चीवर बसावं लागतं. त्यामुळे बसण्यासाठी चांगली खुर्ची निवडणं गरजेचं आहे.
जेणेकरून तुम्ही व्यवस्थित टेकू शकाल. याशिवाय खुर्ची जास्त उंच नसावी हेही लक्षात ठेवा.
तुमच्या पायांचे तळवे जमिनीवर टेकावेत अशी व्यवस्था करा.
3. खाण्या पिण्याच्या वेळा सांभाळा -
कामाच्या ताणामध्ये पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करु नका, मध्ये मध्ये पाणी प्या. यामुळे तुमची चयापचय
क्रिया उत्तम राहतेच शिवाय शरीरालाही ताजेपणा मिळतो. पौष्टिक अन्न खाण्याकडे लक्ष द्या.
वेळोवेळी सेवन करत रहा.खाण्या पिण्याच्या वेळा सांभाळा.