TRENDING:

Winter Health Tips: ऋतू बदलामुळे वाढतोय आजारपणाचा धोका, फिट राहण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स्

Last Updated:

Winter Health Tips in Marathi: सकाळी कडक उन तर रात्री गारवा अशी स्थिती अनेक शहरांमध्ये आढळून येत असल्यामुळे आजारपणाचा धोका वाढलाय. मात्र अशा स्थितीत तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर ‘या’ टिप्स तुमच्यासाठी.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नुकतीच मकर संक्रांती होऊन गेलीये. आध्यात्मिकदृष्ट्या सूर्याने मकरराशीत प्रवेश केलाय. मात्र आपल्यासाठी हा काळ ऋतू संक्रमणाचा आहे. ऋतूचक्रानुसार आता थंडी कमी होऊन गरमी वाढणार आहे. त्यामुळे शरीराला पुन्हा एका नव्या वातावरणाशी जुळवून घ्यावं लागणार आहे. मात्र हवामान बदलामुळे पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सकाळी कडक उन तर रात्री गारवा अशी स्थिती अनेक शहरांमध्ये आढळून येत असल्यामुळे आजारपणाचा धोका वाढलाय. मात्र अशा स्थितीत तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर या टिप्स् तुमच्यासाठी.
प्रतिकात्मक फोटो : ऋतू बदलामुळे वाढतोय आजारपणाचा धोका, फिट राहण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स्
प्रतिकात्मक फोटो : ऋतू बदलामुळे वाढतोय आजारपणाचा धोका, फिट राहण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स्
advertisement

वातावरण बदलामुळे आजारपण का येतं ?

अचानक बदललेल्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शरीराला वेळ लागतो. त्यातच या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य आजारांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे वातावरण बदलामुळे अनेक जण आजारी पडतात. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते त्यांना फार काही त्रास होत नाही किंवा सर्दी, खोकल्या सारख्या आजारांवर त्यांचं निभावून जातं. मात्र ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना. ताप, अंगदुखी, दमा, श्वसनविकार अशा आजारांचा सामना करावा लागू शकतो.

advertisement

जाणून घेऊयात  बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी कशी घ्यायची ते.

पोषक आहार :

हिवाळ्यात विविध संक्रमणांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या शरीराला पोषकतत्त्वांनी परिपूर्ण अशा आहाराची गरज आहे. त्यामुळे हिवाळ्यात जंक फूड टाळून पोषक व्हिटॅमिन, प्रोटिन्स, खनिजं आणि फायबर्सयुक्त आहाराचा समावेश करणं आरोग्याच्या हिताचं ठरतं. याशिवाय संत्री, गाजर, किवी, बीटरूट, आवळा, पेरू आदी व्हिटॅमिन सी युक्त फळं खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.

advertisement

हे सुद्धा वाचा :हिवाळ्यात आजारी पडायचं नाहीये मग खा ‘या’ गोष्टी, शरीर राहील उबदार, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती

शरीर हायड्रेट आणि उबदार ठेवा :

सध्या सकाळी गरमी आणि रात्री थंडी अशा एक वेगळ्याच प्रकारच्या वातावरण बदलाला आपल्याला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे शरीर हायड्रेट आणि उबदार ठेवण्याची गरज आहे. गरजेनुसार उबदार आणि सुती कपड्यांचा वापर करा जेणेकरून शरीराचं रोग्य तापमान राखणं सहज शक्य होईल.

advertisement

व्यायाम :

वातावरण बदलाचा विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होऊन नसेल द्यायचा तर तुम्हाला व्यायाम करण्याची गरज आहे. जास्त थंडीत बाहेर पडणं शक्य नसेल तर घरातल्या घरात चालणं, सूर्यनमस्कार, किंवा योगा सारखे व्यायाम करा ज्यामुळे शरीर आतून उबदार राहायला मदत होईल.

advertisement

हे सुद्धा वाचा : Winter special soups: हिवाळ्यात रमऐवजी प्या हे गरमागरम सूप! मिळेल ताकद, राहाल निरोगी

चांगली झोप :

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे, तुमच्या निरोगी आयुष्यात व्यायाम, आहार याला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व हे शांत आणि गुणवत्तापूर्ण झोपेला आहे. शांत झोपेमुळे तुम्ही अनेक आजारांना दूर ठेऊ शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Health Tips: ऋतू बदलामुळे वाढतोय आजारपणाचा धोका, फिट राहण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स्
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल