मेंदू कमकुवत होणं वयानुसार होत नाही. योग्य सवयींमुळे आपण कोणत्याही वयात मेंदू तीक्ष्ण, सक्रिय ठेवू शकतो. स्मरणशक्ती चांगली ठेवणं आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवणं यासाठी काही गोष्टी लगेच अमलात आणणं शक्य आहे. डॉ. हंसाजी योगेंद्र यांनी त्यांच्या यूट्यूब व्हिडिओमत काही टिप्स दिल्या आहेत ज्या तुम्हाला या समस्या सोडवण्यास मदत करतील.
advertisement
Kamal Mudra : शरीर, मनाच्या थकव्यावर प्रभावी उपाय, कमळ मुद्रा साधेल संतुलन
निरोगी अन्न - मेंदूला चालना देणारे पदार्थ खा. आपण जे खातो त्यावर आपली तब्येत अवलंबून आहे हे लक्षात ठेवा. मेंदूला कार्य करण्यासाठी पोषणाची आवश्यकता असते. अक्रोड, ब्रोकोली, ब्लूबेरी, जवस, हिरव्या पालेभाज्या आणि डार्क चॉकलेट यासारखे पदार्थ मेंदूचं रक्षण करतात आणि स्मरणशक्ती सुधारतात.
भरपूर पाणी प्या - भरपूर पाणी प्यायला विसरू नका. आपला मेंदू 75% पाण्यानं बनलेला आहे. थोड्याशा डिहायड्रेशनने देखील गोंधळ, थकवा आणि स्मरणशक्तीच्या समस्या निर्माण होऊ शकताच. दिवसभरात सहा ते आठ ग्लास पाणी प्या.
चांगली झोप - तिसरी पायरी म्हणजे चांगली झोप. झोप ही मेंदूला रिचार्ज करण्याचं बटण आहे. सात ते नऊ तासांच्या गाढ झोपेमुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मूड सुधारतो. झोपण्यापूर्वी मोबाईल फोन आणि स्क्रीनपासून दूर रहा.
व्यायाम - चौथी पायरी म्हणजे, दररोज थोडा व्यायाम करा. तीस मिनिटं चालणं, योगासनं करणं, नृत्य किंवा इतर कोणतीही क्रिया यामुळे मेंदूला रक्तपुरवठा वाढतो आणि स्पष्टता आणते.
ध्यान - पाचवी पायरी, ध्यानधारणेचा सराव करा. दररोज फक्त दहा मिनिटं, सर्वकाही थांबवा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. या सरावामुळे ताण कमी होतो, एकाग्रता सुधारते आणि मन शांत होते.
काहीतरी नवीन शिका - दररोज काहीतरी नवीन शिका. नवीन पुस्तक वाचा, नवीन भाषा शिका किंवा एखादं वाद्य शिका. या सर्व क्रियांमुळे मेंदूला स्मरणशक्ती सुधारायला मदत होते.
आहार - साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजेच प्रोसेस्ड फूड खाणं कमी करा. जास्त साखर आणि पॅकेज केलेल्या पदार्थांमुळे मेंदूची क्रिया मंदावते. त्याऐवजी, सुकामेवा, फळं, मध आणि संपूर्ण धान्यं खाण्यावर भर द्या.
No Spend Challenge : नो स्पेंड चॅलेंज म्हणजे काय ? नवीन वर्षातला नवा ट्रेंड
ब्रेक्स - कामांमधे लहान ब्रेक घ्या. सतत तेच काम केल्यानं मेंदू थकू शकतो. पन्नास मिनिटं काम केल्यानंतर, दहा-पंधरा मिनिटं ब्रेक घ्या. यामुळे जास्त काळ लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
संवाद साधणं - संपर्कात राहणं. मित्र, कुटुंब, सहकारी आणि इतरांशी बोलल्यानं मेंदू सक्रिय राहतो. सामाजिक संबंधांमुळे संज्ञानात्मक घट कमी होते असंही संशोधनात दिसून आलं आहे.
मनाचा व्यायाम - मनाला आव्हान देणारं काम करा. कोडी, सुडोकू, बुद्धिबळ, मेंदूचे खेळ, या सर्वांमुळे स्मरणशक्ती आणि समस्या सोडवणं दोन्ही सुधारतं.
मन ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. मनाची काळजी व्यवस्थित घेतली, आराम केला तर आपल्याला विचारांची स्पष्टता येणं, स्मरणशक्ती चांगली राहणं आणि आयुष्यभर चांगले निर्णय घेण्यास मदत होते. या सर्व दहा टिप्स खूप सोप्या आहेत आणि त्या दिनचर्येत समाविष्ट केल्यानं मेंदूला चालना मिळू शकते. म्हणून स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि आनंदी रहा.
