गुडघेदुखीसाठी उपयोगी ठरतात 4 आसन :
त्रिकोणासन : त्रिकोनासन केल्याने गुडघ्याचे सांधे मजबूत होतात आणि लवचिकता वाढविण्यास मदत करते. या आसनामुळे पाय, कूल्हे आणि पाठीचा कणा देखील ताणला जातो ज्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो.
वृक्षासन : वृक्षासन शरीराचं संतुलन आणि स्थिरतेत सुधार करण्यासाठी वृक्षासन उत्कृष्ट ठरते. हे गुडघ्याचे सांधे मजबूत करण्यास मदत करते.
advertisement
बालासन : बालासन हे एक विश्रामकारी आसन असून हा गुडघ्यावरील दबाव कमी करतो. हे आसन पाठ आणि कूल्हे सुद्धा स्ट्रेच करतो.
पादांगुष्ठासन : पदांगुस्थासनामुळे पाय आणि गुडघ्यांचे स्नायू मजबूत होतात. हे आसन शरीराचे संतुलन आणि लवचिकता देखील सुधारते.
कोणताही नवा व्यायाम सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, खास करून जेव्हा तुम्हाला पूर्वी कोणतीही दुखापत झाली असेल. योग करत असताना शरीराला अतिप्रमाणात स्ट्रेच करू नका. शक्य असल्यास योग अभ्यासासाठी एखादा ट्रेनर अपॉईंट करा आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली योग करा.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)