अपुरी झोप
मेंदूच्या योग्य कार्यासाठी झोप आवश्यक आहे. मात्र जे तरूण रात्री उशीरा पर्यंत झोपून सकाळी लवकर उठतात किंवा जे पुरेशी झोप घेत नाहीत त्यांचा मेंदू सतत थकलेला असतो. मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी दररोज रात्री किमान 7-8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
advertisement
व्यायाम न करणे
व्यायाम हा केवळ शरीरासाठीच नाही तर मेंदूसाठीही चांगला असतो. नियमित व्यायामामुळे संज्ञानात्मक कार्य, स्मरणशक्ती आणि मूड सुधारण्यास मदत होते. मेंदू निरोगी ठेवण्यासाठी, दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. व्यायाम शक्य नसेल तर किमान 30 मिनीटे चालण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
जंक फूड
जास्त साखर, सॅच्युरेटेड फॅट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ हे फक्त पोटासाठीच नाहीत तर मेंदूसाठी देखील धोक्याचे आहेत असं कोणी तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल मात्र हे खरं आहे. जंक फूडमुळे मेंदूत जळजळ होऊन न्यूरॉन्सचे नुकसान होण्याची भीती असते. तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी फळं, भाज्या आणि पौष्ठिक आणि संतुलित आहार घेणं महत्वाचे आहे.
सतत स्क्रीन पाहात राहणे
फोन, टॅब्लेट किंवा कॉम्प्युटर स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्याने मेंदूवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे डोळ्यांवर ताण, डोकेदुखी आणि इतर त्रासही होऊ शकतात. सतत स्क्रीन पाहत राहाताना अधून मधून ब्रेक घेणे आणि वाचन करण्याची गरज आहे.
सततचा ताणतणाव
दीर्घकालीन तणावाचा मेंदूवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे चिंता, नैराश्य आणि स्मृती समस्या उद्भवू शकतात. मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी ध्यान किंवा दीर्घ श्वासोच्छ्वास यासारख्या तणाव-व्यवस्थापन करण्याची गरज आहे.