कधीकधी हृदयविकाराचा झटका आणि छातीत दुखणे यातील फरक सांगणे कठीण होते. गॅसच्या वेदना छातीच्या अगदी मध्यभागी होतात आणि हृदयविकाराच्या वेळी छातीच्या डाव्या बाजूला तीव्र वेदना आणि दाब जाणवत असतो. गॅसमुळे होणाऱ्या वेदना आणि हृदयविकाराचा झटका यात काय फरक आहे ते जाणून घेऊया.
Heart Attack : पायात दिसतात हार्ट अटॅकची लक्षणं, तुम्हाला तर नाही ना ही समस्या
advertisement
हृदयविकाराचा झटका म्हणजे?
हेल्थलाइन माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका कोरोनरी आर्टरी डिसीजमुळे येतो. यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांपर्यंत योग्य रक्त पोहोचू शकत नाही. हार्ट कार्टरेज ब्लॉकेजमुळे, हृदयाचे कार्य मंद होते आणि हळूहळू काम करणे थांबते. हृदयविकाराचा झटका अचानक येतो, ज्यामुळे अनेक वेळा त्या व्यक्तीला बरे होण्याची संधीही मिळत नाही. याला कार्डिअॅक अरेस्ट असेही म्हणता येईल.
गॅस वेदना आणि हृदयविकाराचा झटका यातील फरक
गॅसच्या दुखण्यामध्ये छातीत जास्त वेदना आणि जळजळ होत असते. हृदयविकाराच्या झटक्यामध्ये छातीच्या डाव्या बाजूला तीव्र वेदना जाणवतात हे लक्षात ठेवा. रिकाम्या पोटी किंवा जास्त खाण्यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. त्याच वेळी हृदयातील समस्या हार्ट कार्टरेजमधील ब्लॉकेजमुळे होऊ शकते. अति धुम्रपान, चहा किंवा कॉफीच्या अतिसेवनामुळे गॅस होतो तर उच्च रक्तदाब, जास्त वजन आणि मधुमेहामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
Heart Attack : कुणाला हार्ट अटॅक आला तर सगळ्यात आधी काय करायचं?
हृदयविकाराची लक्षणे - छातीवर जडपणा किंवा वेदना जाणवणे छातीच्या डाव्या बाजूला तीव्र वेदना होणे दोन्ही हात आणि मानेमध्येही वेदना जाणवू शकतात. थंड घाम येणे. चक्कर येणे. श्वास घेण्यात अडचण
गॅस वेदनांची लक्षणे - पोटदुखी पोट फुगणे छातीत जळजळ होणे. एसिड रिफ्लक्स छाती दुखणे