TRENDING:

Stroke : डोळ्यांच्या समस्या म्हणून दुर्लक्ष करणं पडेल महागात, ब्रेन स्ट्रोक - ट्युमरचे असू शकतात संकेत, जाणून घ्या मज्जासंस्थेच्या विकाराची लक्षणं

Last Updated:

शरारीत काहीतरी चूक घडतं तेव्हा आपलं शरीर लवकर इशारा देण्यास सुरुवात करतं. न्यूरोलॉजिकल आजारांमधेही अशीच लक्षणं दिसून येतात. काहीवेळा ही लक्षणं केवळ डोकेदुखी किंवा चक्कर येण्यापुरती मर्यादित नाहीत. ही लक्षणं स्ट्रोक, अल्झायमर, पार्किन्सन, झोपेच्या समस्या आणि मज्जातंतूंचं नुकसान यासारख्या अनेक गंभीर आजारांची लक्षणं असू शकतात. अनेकदा ही लक्षणं थकवा किंवा वृद्धत्वाची लक्षणं म्हणून दुर्लक्ष करतात, पण नंतर ती घातक ठरू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शरीरात काहीही बदल होत असतात तेव्हा त्याचे संकेत मिळत असतात. या लक्षणांकडे लक्ष देणं तब्येतीच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे.
News18
News18
advertisement

शरारीत काहीतरी चूक घडतं तेव्हा आपलं शरीर लवकर इशारा देण्यास सुरुवात करतं. न्यूरोलॉजिकल आजारांमधेही अशीच लक्षणं दिसून येतात. काहीवेळा ही लक्षणं केवळ डोकेदुखी किंवा चक्कर येण्यापुरती मर्यादित नाहीत. ही लक्षणं स्ट्रोक, अल्झायमर, पार्किन्सन, झोपेच्या समस्या आणि मज्जातंतूंचं नुकसान यासारख्या अनेक गंभीर आजारांची लक्षणं असू शकतात. अनेकदा ही लक्षणं थकवा किंवा वृद्धत्वाची लक्षणं म्हणून दुर्लक्ष करतात, पण नंतर ती घातक ठरू शकतात.

advertisement

Perfume : गळ्यावर परफ्युम स्प्रे करु नका, वाचा प्रकृतीवर होणारे गंभीर परिणाम

धूसर दिसणं किंवा दोन - दोन दिसणं - अचानक एका डोळ्यात धूसर किंवा वस्तू दोन दोन दिसायला लागल्या  तर ती डोळ्यांची समस्या समजू नका. कारण, हे मेंदूच्या समस्येचं लक्षण असू शकतं. हे मल्टीपल स्क्लेरोसिस, ब्रेन ट्यूमर किंवा स्ट्रोकची सुरुवात असू शकते. म्हणून, त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब आपत्कालीन काळजी घ्या.

advertisement

हात किंवा पायात कमकुवतपणा - चहा किंवा कॉफीचा कप उचलताना अचानक अशक्तपणा किंवा थरथर जाणवते का ? किंवा चालताना पाय ओढल्यासारखे वाटतात का? जर तसं असेल तर हे स्ट्रोक किंवा मेंदूच्या संसर्गाचं लक्षण असू शकतं. नस दबल्यामुळे हे होतं असा अनेकांचा समज होतो.

ब्लँकिंग आउट - एखाद्याशी बोलत असताना तुम्ही अचानक गप्प बसलात आणि काही सेकंदांसाठी सर्व काही गायब झाल्यासारखं वाटलं, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हे लक्ष विचलित झाल्यामुळे नाही, परंतु टेम्पोरल लोब सीझरचं लक्षण असू शकतं.

advertisement

अस्पष्ट बोलणं किंवा बोलण्यात अडचण येणं - बोलताना अचानक अडखळणं किंवा बोलण्यात येणाऱ्या अडचणींना साधी चूक समजू नका. तुम्ही स्पष्टपणे बोलू शकत नसाल किंवा इतरांना समजू शकत नसाल तर झोपू नका. वेळेवर रुग्णालयात जा.

व्यायाम किंवा श्रम करताना तीव्र डोकेदुखी - रोजच्या कामाच्या ताणामुळे आणि थकव्यामुळे डोकेदुखी होणं सामान्य आहे आणि कदाचित म्हणूनच लोक त्यांना हलक्यात घेतात, जे नंतर घातक ठरू शकतं. शारीरिक हालचाली जसं की, व्यायाम, धावणं इत्यादी करताना अचानक तीव्र डोकेदुखी जाणवत असेल तर सावधगिरी बाळगा. वेदना हळूहळू होण्याऐवजी अचानक होत असतील तर ते मेंदूतील रक्तस्त्राव किंवा स्ट्रोकचं लक्षण असू शकतं.

advertisement

Face Mask : तेलकट त्वचेसाठी DIY फेसमास्क, कडुनिंबाची पानं आणतील चेहऱ्यावर ग्लो

पाय आणि बोटांमधे सुन्नपणा - हात आणि पायांमधे मुंग्या येणं ही सामान्य गोष्ट आहे आणि काही पोषक घटकांच्या कमतरतेमुळे देखील होऊ शकते. पण, हे असंच चालू राहिलं तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

हे मधुमेह, मज्जातंतूंचे नुकसान किंवा रोगप्रतिकारक शक्तीच्या विकाराचं लक्षण असू शकतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
माघी गणेश जयंतीला भाग्य उजळणार, 6 राशींवर बाप्पाची कृपा होणार!
सर्व पहा

वारंवार Dejavu ची भावना  - कधीकधी आता जे घडतंय ते आधीच घडलंय असं वाटतं. असं वाटणं सामान्य आहे, पण जर ते वारंवार होत असेल तर सावधगिरी बाळगा. हे अपस्माराचं लक्षण असू शकतं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Stroke : डोळ्यांच्या समस्या म्हणून दुर्लक्ष करणं पडेल महागात, ब्रेन स्ट्रोक - ट्युमरचे असू शकतात संकेत, जाणून घ्या मज्जासंस्थेच्या विकाराची लक्षणं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल