Face Mask : घरच्या घरी बनवा कडुनिंबाचा फेस मास्क, नैसर्गिक उपायानं मुरुम होतील गायब आणि चेहरा होईल स्वच्छ
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
त्वचा स्वच्छ राहावी यासाठी कडुनिंबाच्या पानांचा फेस मास्क तुम्ही बनवू शकता. हा फेस मास्क बनवणं एकदम सोपं आहे. योगगुरू कैलाश बिश्नोई यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एका व्हिडिओमधे ही माहिती शेअर केली आहे. कडुनिंबाच्या फेस मास्कसाठी, कडुनिंबाची पानं, बेसन पीठ, हळद हे साहित्य आवश्यक आहे.
मुंबई : चेहऱ्यावर येणारे मुरुम, त्याचे राहणारे डाग, चेहऱ्यावरची उघडी छिद्रं यासारख्या त्वचेच्या समस्यांचं प्रमाण वाढलंय. अनेक कारणांमुळे त्वचेची नैसर्गिक चमक जाते. अनेक घरांमधे, बेसन म्हणजेच डाळीचं पीठ त्वचेसाठी वापरलं जातं. यातच आणखी नैसर्गिक घटक वापरले तर चेहऱ्यासाठी चांगला मास्क घरीच बनवू शकता.
त्वचा स्वच्छ राहावी यासाठी कडुनिंबाच्या पानांचा फेस मास्क तुम्ही बनवू शकता. हा फेस मास्क बनवणं एकदम सोपं आहे.
योगगुरू कैलाश बिश्नोई यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एका व्हिडिओमधे ही माहिती शेअर केली आहे. कडुनिंबाच्या फेस मास्कसाठी, कडुनिंबाची पानं, बेसन पीठ, हळद हे साहित्य आवश्यक आहे.
advertisement
घरगुती फेस मास्क - हा फेस मास्क बनवणं खूप सोपं आहे. कडुनिंबाची पानं आणि पाणी मिक्सरमधे बारीक करून पेस्ट बनवा. ही पेस्ट एका भांड्यात घाला. दोन चमचे बेसन आणि चिमूटभर हळद घाला. सर्व साहित्य चांगलं मिसळा, फेस मास्क तयार आहे.
advertisement
हा घरगुती फेस पॅक चेहऱ्यावर पूर्णपणे लावा आणि पंधरा - वीस मिनिटं तसंच राहू द्या. यानंतर, स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवा. काही दिवस असं केल्यानं मुरुमं, त्याचे डाग आणि उघडी छिद्र कमी होतील.
कडुनिंबाच्या पानांमधे अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, यामुळे त्वचेवरची सूज, मुरुम, पुरळ आणि काळे डाग कमी होतात. या सगळ्या गुणधर्मांमुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 7:06 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Face Mask : घरच्या घरी बनवा कडुनिंबाचा फेस मास्क, नैसर्गिक उपायानं मुरुम होतील गायब आणि चेहरा होईल स्वच्छ










