TRENDING:

Tips And Tricks : तुमचे पांढरे शूज पिवळे दिसतायंत? किचनमधील 'या' वस्तू काही मिनिटांत घालवतील सर्व डाग!

Last Updated:

How to remove yellowness of white shoes : तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण पिवळे झालेले शूज परत पांढरे बनवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोपे आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहोत. चला पाहूया ते कोणते आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शूज स्वच्छ ठेवणं खरं तर तितकं सोपं काम नाही. कारण आपण त रोज वापरतो. मात्र नियमित ते धुणं आपल्याला शक्य होत नाही. कधी ते धुतलेही तरीही ते वळायला खूप वेळ लागतो. म्हणूनच बरेच लोक ते धुण्यापेक्षा नियमितपणे पुसणे पसंत करतात. याने शूजवरची धूळ तर निघून जाते. मात्र कालांतराने त्यांचा पांढरा रंग पिवळा पडू लागतो. नंतर हा रंग परत आणणं आपल्याला अवघड जाऊ शकतं.
पांढरे शूज कसे स्वच्छ करावे?
पांढरे शूज कसे स्वच्छ करावे?
advertisement

मात्र तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण पिवळे झालेले शूज परत पांढरे बनवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोपे आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहोत. चला पाहूया ते कोणते आहेत.

शूज पुन्हा पूर्ववत करण्यासाठी करा हे उपाय..

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर पेस्ट : पांढरे शूज स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचे मिश्रण खूप प्रभावी मानले जाते. हे मिश्रण हट्टी घाण, डाग आणि पिवळेपणा सैल करते आणि काढून टाकते. यासाठी एका भांड्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर प्रत्येकी एक चमचा घ्या. हवे असल्यास थोडे कोमट पाणी घालून पेस्ट बनवा. शूजवर डाग असलेल्या भागांवर जुन्या टूथब्रशने लावा आणि 5-10 मिनिटे सुकू द्या. नंतर हलक्या हाताने घासून ओल्या कापडाने पुसा. याने शूज बऱ्यापैकी स्वच्छ दिसतील.

advertisement

टूथपेस्ट : टूथपेस्ट दातांसोबत शूजची चमक देखील परत आणू शकते. हलक्या डागांवर आणि निस्तेजपणावर ते खूप प्रभावी आहे. यासाठी टूथपेस्ट घ्या आणि ती डाग असलेल्या भागावर लावा. टूथपेस्ट मात्र पांढरीच वापरा. नंतर मऊ ब्रशने गोलाकार हालचालीत हळूवारपणे घासा आणि 10-15 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर ओल्या कापडाने पुसा. यामुळे शूजला सहज पांढरा रंग परत मिळेल.

advertisement

लिंबू आणि मीठ नैसर्गिक क्लिनर : लिंबाचे नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म आणि मीठ पिवळेपणा दूर करण्यास मदत करतात. यासाठी लिंबू अर्धे कापून त्यावर मीठ शिंपडा. बुटाच्या पिवळ्या भागावर घासून घ्या. 5-10 मिनिटे राहू द्या. नंतर ब्रशने हळूवारपणे घासून पाण्याने किंवा ओल्या कापडाने स्वच्छ करा. शूज स्वच्छ, पांढरे आणि फ्रेश दिसतील.

नेलपॉलिश रिमूव्हर : पांढऱ्या शूजवर पडलेले पेन, शाई किंवा रबरचे डाग नियमित स्वच्छतेने निघत नाहीत. अशावेळी नेलपॉलिश रिमूव्हर उपयुक्त ठरू शकतो. यासाठी कापसावर थोडेसे रिमूव्हर लावून ते डागावर हळूवारपणे घासा. डाग लवकर निघून जाईल. नंतर ओल्या कापडाने पुसा. पण ते फक्त तेवढ्याच जागेवर वापरा.

advertisement

डिश वॉश लिक्विड आणि कोमट पाणी : डिश वॉश लिक्विड कापड किंवा कॅनव्हास शूजसाठी खूप उपयुक्त आहे. ते सहज घाण आणि डाग काढून टाकते. एक कप कोमट पाण्यात एक चमचा डिश वॉशिंग लिक्विड मिसळा. द्रावणात कापड किंवा ब्रश बुडवा आणि तुमचे शूज स्वच्छ करा. नंतर ते स्वच्छ पाण्याने पुसा. तुमचे शूज नेहमी सावलीत वाळवा, थेट सूर्यप्रकाशात नाही.

advertisement

पांढरे शूज पिवळे पडू नये यासाठी टिप्स..

शूज घातल्यानंतर कोरड्या कापडाने पुसा, जर ते घाण झाले असतील तर लगेच स्वच्छ करा, शूज जास्त वेळ उन्हात वाळवू नका, गरज पडल्यास शूज प्रोटेक्टर स्प्रे वापरा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
35 हजार मीटर दोऱ्याने साकारले शिवराय; सोलापूरच्या तरुणाचं अनोखं 'स्ट्रिंग आर्ट'
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : तुमचे पांढरे शूज पिवळे दिसतायंत? किचनमधील 'या' वस्तू काही मिनिटांत घालवतील सर्व डाग!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल