जाणून घेऊयात हिवाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी या बाबत तज्ज्ञांचा सल्ला
मुलांना उबदार कपडे घाला
हिवाळ्यात मुलांना उबदार कपडे घालणे आणि त्यांचे हात आणि पाय झाकून ठेवणे खूप महत्वाचे आहे. यामुळे त्यांचं थंड हवेपासून रक्षण होतं. जर लहान मुलांना थंडी बाधली तर त्यांना थंडीतला अतिसार आणि न्यूमोनियासारखे आजार होतात.
advertisement
थंडीतला अतिसार
थंडीतला अतिसार टाळण्यासाठी अधिक स्वच्छता राखण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मुलांना उकळून, थंड करून गाळून पाणी दिलं तर त्यांना फायदा होऊ शकतो. झाकलेलं अन्न खाणं हे केव्हाही फायद्याचं असतं. मात्र हिवाळ्यात उघडं अन्न खाणं प्रकर्षानं टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
हे सुद्धा वाचा : लहान मुलं असतात नाजूक, त्यांना थंडीत कसं जपावं? आयुर्वेद सांगतं...
स्तनपान चालू ठेवा
मुल जर नवजात असेल तर त्यांचं स्तनपान हे सुरूच ठेवणे फार महत्वाचं आहे कारण आईच्या दुधात असेलल्या पोषक तत्त्वांमुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत व्हायला मदत होते. नवजात मुलं हिवाळ्याच आजारी पडण्याचा धोका अधिक असतो, त्यामुळे पालकांना मुलांच्या आरोग्याबाबत सतर्क राहावं असं तज्ज्ञ सांगतात
मुलांना भरपूर पाणी द्या.
हिवाळ्यात अनेकदा आपल्याला तहान लागत नाही. त्यामुळे लहान मुलंही पाणी पिण्यास टाळाटाळ करतात. मात्र दर दोन तासांनी पालकांनी आपल्या मुलांना पाणी द्यायला हवं असा सल्ला डॉक्टर देतात. ठराविक अंतराने पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहायला मदत होते, त्यामुळे संक्रमित आजारांचा धोका टाळता येतो.