TRENDING:

Monsoon : पाऊस सुरु असताना एसी वापरणं सुरक्षित की धोक्याचं? 90 टक्के लोकं करतात ही चूक

Last Updated:

समजा मुसळधार पाऊस पडत असेल तर अशा वेळी एअर कंडिशनर वापरणं योग्य आहे का? किंवा त्यामुळे कोणताही धोका होऊ शकतो, याबाबत अनेकजण संभ्रमात असतात. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
एसीची थंड हवा खूप आरामदायक असते. एसीमुळे उकाड्यापासून मोठा दिलासा मिळतो. उन्हाळ्यात एसीच्या कूलिंग इफेक्टची इतर कशाशीही तुलना होऊ शकत नाही. उन्हाळ्यात एसीशिवाय राहणं अवघड असतं, पण आता पावसाळा सुरू झाला आहे. बऱ्याच ठिकाणी सतत पाऊस पडत आहेत आणि उकाडाही कमी झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात एसी सुरू ठेवणं योग्य आहे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. समजा मुसळधार पाऊस पडत असेल तर अशा वेळी एअर कंडिशनर वापरणं योग्य आहे का? किंवा त्यामुळे कोणताही धोका होऊ शकतो, याबाबत अनेकजण संभ्रमात असतात.
पाऊस सुरु असताना एसी वापरणं सुरक्षित की धोक्याचं? 90 टक्के लोकं करतात ही चूक
पाऊस सुरु असताना एसी वापरणं सुरक्षित की धोक्याचं? 90 टक्के लोकं करतात ही चूक
advertisement

पाऊस तुमच्या एसी युनिटसाठी हानिकारक नाही, मग तो विंडो एसी असो किंवा स्प्लिट एसी युनिट असो. पावसाळ्यात ह्युमिडिटी खूप वाढते आणि अशा परिस्थितीत एसी वापरणं फायद्याचं ठरतं. एसीची हवा रूमला खूप आरामदायी बनवते, कारण पावसाळी हवेत भरपूर आर्द्रता असते. एसी आर्द्रता कमी करण्याचं काम करतो आणि कोरडी हवा पुरवतो ज्यामुळे हवेतील मॉईश्चर कमी होते.

advertisement

Weight Loss : गरम की थंड... कोणतं पाणी प्यायल्याने वजन लवकर कमी होईल? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

एसीसाठी थोडासा पाऊस अनेक कारणांमुळे चांगला असतो असं म्हणतात. पावसाचा तुमच्या एसी युनिटवर नकारात्मक परिणाम होत नाही. तुमच्या एसीच्या आउटडोअर युनिटमध्ये पडलेला कचरा साफ करण्यासाठी पाऊस मदतीचा ठरू शकतो. पाऊस खूप जास्त असेल आणि युनिटच्या आजूबाजूला पाणी साचत असेल तरच तुम्हाला पावसाळ्यात एसीची काळजी करण्याची गरज असते. तुमच्या आउटडोअर युनिटच्या आसपास पाणी तुंबत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही एसी बंद ठेवायला हवा, कारण यातून विजेचा करंट प्रवाहित होण्याचा धोका उद्भवतो.

advertisement

पावसात एसी झाकून ठेवावा का?

बाहेर खूप पाऊस पडत असेल तर एसी आउटडोअर युनिट झाकून खोलीत एसी सुरू करावा, असं अनेकांना वाटतं, पण हे बरोबर नाही. एसी झाकून तो चालू केल्याने गरम हवा बाहेर पडू शकणार नाही ज्यामुळे एसीवर दबाव येईल आणि त्याचा नकारात्मक परिणाम युनिटवर होईल. त्यामुळे एसी झाकून कधीही एसी चालवू नका. एसी चालू नसताना युनिट झाकून ठेवू शकता.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Monsoon : पाऊस सुरु असताना एसी वापरणं सुरक्षित की धोक्याचं? 90 टक्के लोकं करतात ही चूक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल