माणसाचं आयुष्य 150 वर्षे करण्याचा फॉर्म्युला शास्त्रज्ञांना सापडला आहे. चीनमधील शास्त्रज्ञ आयुष्यमान वाढवणारं औषध तयार करत आहेत. शेन्झेनमधील लोन्वी बायोसायन्सेस लॅबमधील संशोधकांनी PCC1 या अँटी एजिंग औषधावर काम सुरू केलं आहे.
काय आहे PCC1?
PCC1 म्हणजे प्रोसायनिडिन C1, द्राक्षाच्या बियांमध्ये आढळणारं एक नैसर्गिक पॉलीफेनॉल कंपाऊंड आहे, त्याला सेनोलिटिक कंपाऊंड म्हणतात. PCC1 चं कार्य शरीरात जमा झालेल्या वृद्ध पेशी, म्हणजेच जुन्या आणि कार्य न करणाऱ्या पेशी काढून टाकणं. ते शरीरातील वृद्धत्व, जळजळ, अशक्तपणा आणि अनेक वय-संबंधित आजारांचं कारण ठरणाऱ्या 'जंक सेल्स' काढून टाकतं आणि नवीन पेशींना चांगलं कार्य करण्यास उत्तेजित करतं.
advertisement
उंदरांवर आणि काही टिश्यू मॉडेल्सवर प्रयोग केले गेले आहेत. अभ्यासात, PCC1 ने निरोगी पेशी वाचवताना उंदरांमध्ये वृद्धत्वाच्या पेशी निवडकपणे नष्ट केल्या. औषध घेतलेले उंदीर सरासरी ९ टक्के जास्त जगले. उपचारानंतरच्या आयुर्मानाचा विचार केला तर, त्यांचं आयुर्मान 64.2 टक्के जास्त होतं. हा निष्कर्ष 2021 मध्ये नेचर मेटाबोलिझम जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासावर आधारित आहे.
हे खरंच शक्य आहे?
कंपनी आता या तंत्रज्ञानाचा मानवांसाठी गोळी म्हणून विकास करत आहे. कंपनीचे सीईओ, यिप त्सझोउ (जिको) यांनी या गोळीला 'लॉन्गेविटी साइन्सचं होली म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, निरोगी जीवनशैलीसह, 150 वर्षांपर्यंत जगणं काही वर्षांतच वास्तवात येऊ शकतं.
अद्याप या औषधाची मानवांवर चाचणी केलेली नाही. च्यामुळे इतर शास्त्रज्ञांच्या मते, मानवांमध्येही असा परिणाम साध्य होईल की नाही हे सांगणं खूप लवकर आहे. क्लिनिकल चाचण्या, शेकडो चाचण्या आणि वर्षानुवर्षे अभ्यास अद्याप प्रलंबित आहेत. मानवी चाचण्या लांब आणि गुंतागुंतीच्या आहेत. याशिवाय FDA आणि WHO सारख्या एजन्सींकडून मान्यता आवश्यक आहे. औषध प्रत्यक्षात येण्यासाठी काही वेळ लागेल. शिवाय वृद्धत्वात हजारो घटकांचा समावेश आहे. फक्त पेशी काढून टाकल्याने सर्वकाही सुटणार नाही.
बक इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन एजिंगमधील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की उंदरांवरील निकाल आशादायक आहेत, पण तसंच मानवामध्ये घडेल के कठीण. ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. औषधाची प्रभावीता आणि सुरक्षितता सिद्ध करण्यासाठी मोठ्या आणि कठोर क्लिनिकल चाचण्यांची आवश्यकता आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की मानवी आयुर्मान इतक्या प्रमाणात वाढवण्याच्या दाव्यांसाठी असाधारण संशोधन पुरावे आवश्यक आहे.
