कोणतेही जोडपे हे परिपूर्ण नसते आणि तशी अपेक्षा बाळगणं देखील योग्य नाही. परंतु परंतु हे देखील समजून घेणे महत्त्वाचं आहे की लग्न ही परिपूर्णतेची शर्यत नसून ते एक सुंदर नाते आणि त्यात दररोज, प्रत्येक परिस्थितीत आपला जोडीदारासोबत उभे राहणे महत्त्वाचे असते. अहंकाराशी करावा लागणारा संघर्ष हे लग्नातील सर्वात मोठे आव्हान असते. अनेकदा लोकांना तो संभाळता येत नाही आणि नात्यात दुरावा येऊ लागतो. मग सुरू होतो, मी, मला आणि माझा प्रवास आणि त्याचा शेवट नातं तुटण्यापर्यंत जातो. परंतु नातं टिकवण्यासाठी अहंकाराऐवजी जोडीदाराला महत्त्व देणं गरजेचं असतं आणि हेच बॉलीवूड अभिनेता 'फॅमिलीमॅन' मनोज बाजपेयी यांचंही मत आहे.
advertisement
ओटीटीवरील लोकप्रिय सिरीज 'द फॅमिली मॅन'मधील मनोज वाजपेयी यांचे पात्र नातेसंबंधांच्या ताणतणावात अडकलेले असले तरी, त्याचे वास्तविक जीवनातील लग्न मात्र याच्या पूर्णपणे उलट आहे. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला आणि प्रत्येक जोडप्याने नक्की आत्मसात करावा असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
मनोज बाजपेयी यांनी सांगितले की ते आणि त्यांची पत्नी 15 वर्षांपासून एकत्र आहेत. या 15 वर्षांत त्यांच्यात फारशी भांडणे झालेली नाहीत. आजच्या जगात जिथे नातेसंबंध क्षुल्लक गोष्टींवरून तुटतात, तिथे मनोज वाजपेयी यांच्याकडे एक सुंदर उदाहरण म्हणून पाहिले जाऊ शकते. त्यांनी सांगितले की त्यांचे लग्न नेहमीच सुरळीत, कोणत्याही मोठ्या ड्राम्याशिवाय चालले आणि यामुळे ते आणखी मजबूत होतात.
मनोज बाजपेयी यांचा विवाह मंत्र
मुलाखतीत मनोज यांनी प्रत्येक नात्यासाठी एक मौल्यवान धडा सांगितला. ते म्हणाले, "प्रेम सोपे नसते, तुम्हाला तुमचा अहंकार, तुमचा इगो मागे ठेवावा लागतो... तरच तुम्ही लग्नासारखे नाते दीर्घकाळ टिकवू शकता." याचा अर्थ असा की नातेसंबंधांना जिंकण्याची गरज नाही, समजून घेण्याची आवश्यकता आहे. जेव्हा दोन्ही जोडीदारांनी अहंकारापेक्षा प्रेम आणि समजूतदारपणाला प्राधान्य दिले तर नातं अधिक मजबूत होते. मनोज वाजपेयी यांचे हे शब्द केवळ सेलिब्रिटी जोडप्यांसाठीच नाही तर दीर्घकालीन नातेसंबंध हवे असलेल्या प्रत्येकासाठी मंत्र आहेत.
लग्न कसे सोपे होऊ शकते?
प्रसिद्ध रिलेशनशिप कोच अमिश धिंग्रा यांनी असेही स्पष्ट केले की जेव्हा पती-पत्नी मोकळेपणाने संवाद साधतात, एकत्र वेळ घालवतात, एकमेकांना आधार देतात आणि छोट्या छोट्या हावभावांमधून प्रेम जिवंत ठेवतात, तेव्हा लग्नातील नातं सर्वोत्तम बनत जातं. त्यांनी संयम, क्षमा, एकमेकांना स्पेस देणे आणि छोट्या छोट्या दैनंदिन ताणतणावांमध्येही एकमेकांना आधार देणे गरजेचे असल्याचे देखील सांगितले.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
