ब्रेन ट्यूमरचे प्रमुख संकेत
सततची आणि तीव्र डोकेदुखी
जर तुम्हाला रोज किंवा सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल, जी सकाळी उठल्यावर जास्त होते आणि सामान्य वेदनाशामक औषधांनीही कमी होत नाही, तर हे ब्रेन ट्यूमरचे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते.
मळमळ आणि उलटी
काहीवेळा कोणत्याही कारणाशिवाय मळमळ आणि उलटी होत असेल, विशेषतः सकाळी, तर हे मेंदूवरील वाढलेल्या दाबामुळे असू शकते.
advertisement
दृष्टीदोषाची समस्या
एकाएकी अंधुक दिसणे, दोन वस्तू दिसणे किंवा एका डोळ्याने कमी दिसणे अशा समस्या जाणवल्यास हे गंभीर लक्षण असू शकते.
शरीराच्या एका भागात कमजोरी
मेंदूच्या ज्या भागात ट्यूमर आहे, त्याच्यावर अवलंबून, शरीराच्या एका बाजूला किंवा अवयवात अशक्तपणा, बधिरता किंवा संवेदना कमी झाल्यासारखे वाटू शकते.
अचानक झटके येणे
ज्या लोकांना कधीच झटके आले नाहीत, त्यांना अचानक फिट्स किंवा झटके येऊ लागल्यास हे ट्यूमरचे पहिले लक्षण असू शकते.
व्यक्तिमत्वात बदल
स्वभावात किंवा व्यक्तिमत्वात अचानक आणि मोठे बदल, गोंधळ, निर्णय घेण्यात अडचण आणि स्मृतीभ्रंश ही देखील काही लक्षणे असू शकतात.
ही लक्षणे केवळ ब्रेन ट्यूमरमुळेच होतात असे नाही, पण ती दिसल्यास कोणत्याही परिस्थितीत त्यांना गांभीर्याने घ्या. तात्काळ न्यूरोलॉजिस्ट किंवा डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य तपासणी करून घ्या. वेळेवर निदान झाल्यास, उपचार अधिक प्रभावी ठरतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)