TRENDING:

Health Risks of Obesity: लठ्ठपणा वाढतोय? आत्ताच व्हा सावध, होतील ‘इतके’ आजार, जाऊ शकतो जीव

Last Updated:

Risk of obesity in Marathi: भारतात अनेक लोकांच्या पोटावर किंवा कमरेभोवती चरबी आढळून येते. ‘थोडसं वजन वाढल्याने काय फरक पडतो? किंवा वयोमानाप्रमाणे वजन वाढणारचं’ असा विचार करून अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र वाढलेलं हे वजन तुमच्यासाठी काळ बनून विविध आजारांना निमंत्रण देऊ शकतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ओबेसिटी किंवा स्थूलपणा सध्या सगळ्या जगाची डोकेदुखी ठरताना दिसतोय. भारतात 26 ते 27 कोटी जनता  लठ्ठपणाची शिकार झाली आहे. जागतिक लठ्ठपणाच्या बाबतीत भारतातल्या लठ्ठपणाचा प्रकार वेगळा आहे. भारतात पोटाचा घेर वाढलेल्या प्रकारचा लठ्ठपणा अधिक आढळून येतो. मात्र अशा व्यक्ती लठ्ठपणाच्या बाबतीत गंभीर आढळून येत नाहीत. भारतात अनेक लोकांच्या पोटावर किंवा कमरेभोवती चरबी आढळून येते. ‘थोडसं वजन वाढल्याने काय फरक पडतो? किंवा वयोमानाप्रमाणे वजन वाढणारचं’ असा विचार करून अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र वाढलेलं हे वजन तुमच्यासाठी काळ बनून विविध आजारांना निमंत्रण देऊ शकतं. त्यामुळे लठ्ठपणाच्या विरोधात आता केंद्र सरकारही जागरूक झालेलं दिसतंय. लठ्ठपणाच्या विरोधात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा जनजागृती करताना दिसत आहेत.
News18
News18
advertisement

जाणून घेऊयात लठ्ठपणाचे संभाव्य धोके आणि लठ्ठपणा टाळण्याचे साधे, सोपे, घरगुती उपाय

लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय ?

बिर्ला हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. तुषार तायल म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीचा बीएमआय 30 पेक्षा जास्त असेल तर त्याने लठ्ठपणाबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. जर पुरुषाची कंबर 40 इंचापेक्षा जास्त असेल आणि महिलांची कंबर 35 इंचापेक्षा जास्त असेल तर त्यांनी सतर्क राहायला हवं. अनेकदा काही व्यक्तींना चालताना दम लागतो. मात्र त्याचं त्याकडे दुर्लक्ष होतं. थोडं चालल्यानंतर किंवा कमी श्रमाचं काम करूनही दम लागत असेल तर समजून जा की तुम्ही लठ्ठपणाचा शिकार झाला आहात आणि तुम्हाला त्वरित तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर जीवघेण्या आजारांची मगरमिठी तुम्हाला बसू शकते.

advertisement

लठ्ठपणामुळे होणारे आजार

डॉ. तुषार तायल म्हणतात की, ‘लठ्ठपणामुळे फक्त एकच नाही तर अनेक आजार होतात. जर तुमचं वजन सतत वाढत राहिलं किंवा तुम्ही लठ्ठपणावर  नियंत्रण नाही मिळवलं तर त्याचा सगळ्यात पहिला परिणाम यकृतावर होतो. ज्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. लठ्ठपणामुळे धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढून रक्त प्रवाहास अडथळा निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास वाढून हृदयरोगचा धोका वाढतो. यामुळे हृदयविकाराचा सौम्य किंवा तीव्र झटका येण्याची भीती असते. याशिवाय मधुमेह, श्वसनाचे विकार, वजन वाढल्यामुळे सांधेदुखीचा त्रास इतक्या आजारांची शक्यता असते. वाढत्या वजनाचा विपरीत परिणाम किडनीवर होऊन मूत्रपिंड निकामी होण्याची भीती असते. लठ्ठपणामुळे अनेकदा व्यक्ती मानसिक आजारांची देखील शिकार होऊन डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, लठ्ठपणामुळे निद्रानाश देखील होऊ शकतो.’

advertisement

लठ्ठपणा टाळण्यासाठी हे करा

आधी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्यात लठ्ठपणाची लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमच्या जीवनशैलीत बदल करा. जंकफूड टाळून पोषक आहार घ्यायला सुरूवात करा. सकाळी हलका व्यायाम आणि रात्रीच्या जेवणानंतर शतपावली घालायला सुरूवात करा. ज्यामुळे कॅलरीज बर्न होऊन तुमचं वाढलेलं वजन कमी व्हायला मदत होईल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Risks of Obesity: लठ्ठपणा वाढतोय? आत्ताच व्हा सावध, होतील ‘इतके’ आजार, जाऊ शकतो जीव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल