TRENDING:

Immunity : हिवाळ्यासाठी लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स, घरातल्या मसाल्यांचा करता येईल वापर

Last Updated:

हिवाळ्यात, पालक आपल्या मुलांच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक असतात. अनेक घरांमधे, हळद दूध हा सर्दी - खोकल्यावरचा हमखास उपाय आहे. विशेषतः रात्री झोपण्याआधी हळद - सुंठ घालून दूध देण्याची परंपरा अजूनही अनेक भारतीय घरांमध्ये पाळली जाते. हे मसाले शरीराला आतून उबदार ठेवतातच शिवाय मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठीही याचा उपयोग होतो. ज्यामुळे सर्दी आणि खोकल्याचा धोका कमी होतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिवाळ्यात काही वेळा थंड, काही वेळा अति थंड हवा असते. यामुळे, काहींना सर्दी, खोकला, संसर्ग होणं यासारखे त्रास होत असतात.
News18
News18
advertisement

हिवाळ्यात, पालक आपल्या मुलांच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक होतात. अनेक घरांमधे, हळद दूध हा सर्दी - खोकल्यावरचा हमखास उपाय आहे. विशेषतः रात्री झोपण्याआधी हळद - सुंठ घालून दूध देण्याची परंपरा अजूनही अनेक भारतीय घरांमध्ये पाळली जाते. हे मसाले शरीराला आतून उबदार ठेवतातच शिवाय मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठीही याचा उपयोग होतो. ज्यामुळे सर्दी आणि खोकल्याचा धोका कमी होतो.

advertisement

Make Up : रोज मेकअप केल्यानं त्वचा खराब होते का ? वाचा खास स्किन केअर टिप्स

मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी -

- दुधात थोडीशी काळी मिरी टाकल्यानं सौम्य उष्णता निर्माण होते. त्यातील घटक हळदीसारख्या मसाल्यांचा प्रभाव वाढविण्यास देखील मदत करतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारू शकते. काळ्या मिरीमधे अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात आणि पचनक्रिया चांगली राखण्यास देखील ती उपयुक्त मानली जाते. हिवाळ्यात मुलांना नाक बंद होणं किंवा छातीत बंद झाल्यासारखं वाटत असेल तर दुधात चिमूटभर काळी मिरी मिसळल्यानं फायदा होऊ शकतो.

advertisement

- दुधात ताजं किसलेलं आलं किंवा सुंठ टाकल्याने त्याचा प्रभाव वाढतो. आलं शरीराला आतून उबदार करण्यास मदत करतं आणि त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी ओळखलं जातं. हिवाळ्यात घसा खवखवणं किंवा सौम्य खोकला मुलांना त्रास देऊ शकतो. आलं घातलेलं दूध घेतल्यानं घशाला आराम मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारतं.

Eggs Intake : दररोज किती अंडी खाणं योग्य ? रोज अंडी खाण्याचे काय फायदे ?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
15 वर्षांच्या पूजाच्या मागे लागला साप? 3 महिन्यात 7 वेळा केला दंश, जालन्यातील...
सर्व पहा

- दालचिनी हा मसाला हिवाळ्यात विशेष फायदेशीर असतो. यातले अँटीऑक्सिडंट आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म मुलांना हंगामी संसर्गापासून वाचवण्यास मदत करू शकतात. दूध आणि मधासोबत दालचिनीची चव चांगली असते आणि श्वसनाच्या समस्यांवर उपाय म्हणून त्याचा चांगला वापर होऊ शकतो. पण दालचिनी जास्त प्रमाणात वापरु नये, चवीला थोडी तिखट असल्यानं, दुधात फक्त एक चिमूटभर घालणं चांगलं.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Immunity : हिवाळ्यासाठी लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स, घरातल्या मसाल्यांचा करता येईल वापर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल