TRENDING:

Hydration : तहान लागेपर्यंत थांबू नका, वेळेवर पाणी पित जा, जाणून घेऊया हायड्रेशनचं महत्त्व

Last Updated:

शरीरातील प्रत्येक पेशी जिवंत ठेवण्यासाठी पाणी गरजेचं आहे. किती पाणी प्यावं, किती वेळा प्यावं आणि कधी पिऊ नये याबद्दल सहसा चर्चा केली जात नाही, पण प्रौढ व्यक्तीच्या शरीराचा सुमारे साठ टक्के भाग पाण्यानं बनलेला असतो. थोडाशा डिहायड्रेशनमुळेही मूड, स्मरणशक्ती, त्वचा आणि पचनावर परिणाम होऊ शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्या शरीरात अंदाजे साठ टक्के पाणी असतं. तहान लागल्यावर आपण पाणी पितोच पण नियमित अंतरानंही पाणी पिणं गरजेचं आहे. शरीराच्या चयापचयासह सर्व कार्यांसाठी पुरेसं पाणी हा अत्यावश्यक घटक आहे.
News18
News18
advertisement

आपण पाणी पिणं का महत्त्वाचं आहे ते समजून घेऊया - जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, शरीराचं तापमान, रक्तप्रवाह आणि अवयवांचं कार्य योग्य राखण्यासाठी पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे.

उष्ण हवामान, आजारपण किंवा वाढत्या शारीरिक हालचाली दरम्यान डिहायड्रेशन वेगानं होऊ शकतं. याची नेहमीच गंभीर लक्षणं दिसतील असं नाही. पण यामुळे थोडी अस्वस्थता जाणवू शकते.

advertisement

Fatty Liver : चुकीच्या सवयींमुळे येतो यकृतावर ताण, वाढतो गंभीर आजारांचा धोका

शरीरातील प्रत्येक पेशी जिवंत ठेवण्यासाठी पाणी गरजेचं आहे. किती पाणी प्यावं, किती वेळा प्यावं आणि कधी पिऊ नये याबद्दल सहसा चर्चा केली जात नाही, पण प्रौढ व्यक्तीच्या शरीराचा सुमारे साठ टक्के भाग पाण्यानं बनलेला असतो. थोडाशा डिहायड्रेशनमुळेही मूड, स्मरणशक्ती, त्वचा आणि पचनावर परिणाम होऊ शकतो.

advertisement

तहान म्हणजे पाणी पिण्याची गरज. शरीरानं दिलेली ही पूर्वसूचना असते. तुमचं तोंड कोरडं पडू लागतं तेव्हा शरीर आधीच डिहायड्रेट झालेलं असतं.

डिहायड्रेशनची लक्षणं समजून घेऊयात - रात्रीच्या पूर्ण झोपेनंतरही सततचा थकवा जाणवणं हे डिहायड्रेशनचं लक्षण असू शकतं. द्रवपदार्थांच्या कमतरतेमुळे रक्ताचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे हृदयाला जास्त काम करावं लागतं. यामुळे एकाग्रतेवरही परिणाम होऊ शकतो. राष्ट्रीय आरोग्य संस्थांच्या अहवालानुसार, हळूहळू वाढणारी सौम्य डोकेदुखी देखील डिहायड्रेशनचं प्रारंभिक लक्षण आहे.

advertisement

Cancer Risk : शाकाहारामुळे कर्करोगांचा धोका कमी ? जाणून घ्या शास्त्रज्ञांचं मत

डिहायड्रेशनमुळे मेंदूच्या ऊतींचं तात्पुरतं आकुंचन होऊ शकतं, ज्यामुळे दाब बदलतो आणि वेदना होतात.

त्वचा निस्तेज आणि ओढल्यासारखं वाटणं हे देखील एक लक्षण असू शकतं. चेहरा धुतल्यानंतर ताणणं किंवा वाढलेल्या बारीक रेषा हे त्याचंच निदर्शक आहे. हाताची त्वचा हळूवारपणे ओढा; जर ती सामान्य होण्यास वेळ लागला तर ते डिहायड्रेशनमुळे होऊ शकतं.

advertisement

मूत्राचा रंग - अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, फिकट पिवळा रंग सामान्य मानला जातो, पण गडद पिवळा किंवा तीव्र वास असलेली लघवी द्रवपदार्थाच्या कमतरतेचं लक्षण आहे. आतडी मलामधून पाणी शोषून घेत असल्यानं बद्धकोष्ठता किंवा मंद पचन ही पाणी पुरेसं न प्यायल्याची लक्षणं असू शकतात. गोड पदार्थांची अचानक इच्छा होणं याचाही डिहायड्रेशनशी संबंध असू शकतो.

शरीर उर्जेसाठी ग्लुकोज सोडण्यासाठी पाण्याचा वापर करतं आणि पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा वाढू शकतो. स्नायूंमधे पेटके येणं किंवा अचानक चक्कर येणं हे देखील इलेक्ट्रोलाइट असंतुलनाचं लक्षण असू शकतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शाहरूख अन् सलमान खानला पाहायचं? फक्त 50 रुपयांत होईल 'भेट', वांद्र्यात फिरण्याचा
सर्व पहा

वय, हवामान आणि दिनक्रमावर पाणी किती प्यावं अवलंबून असतं. बहुतेक तज्ज्ञ प्रौढांसाठी दिवसातून दोन ते तीन लीटर द्रवपदार्थ पिण्याचा सल्ला देतात. थोडक्यात, प्रत्येक दिवस चांगला जाण्यासाठी पुरेसं पाणी पिणं ही आपली जबाबदारी आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hydration : तहान लागेपर्यंत थांबू नका, वेळेवर पाणी पित जा, जाणून घेऊया हायड्रेशनचं महत्त्व
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल