फिट दिसण्यासाठी जिममधे जायलाच हवं असं नाही पण खूप बिझी असलात तरी स्वत:ची खास पाच मिनिटं तरी महिलांनी राखून ठेवायला हवी. धावपळ, तणाव तर असतातच पण यातून मार्ग काढत तुमच्या दिवसातील पाच मिनिटं द्यायची आहेत. पाच छोट्या सवयी धावपळीच्या आयुष्यातही तुम्हाला दिलासा आणि ताकद देणाऱ्या ठरतील.
Late Dinner : रात्री उशिरा जेवल्यानं कर्करोग होतो ? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य
advertisement
दिवसाची सुरुवात स्ट्रेचिंगनं - जागं झाल्यावर पाच मिनिटं स्ट्रेचिंग करणं खूप फायदेशीर आहे. अलार्म वाजताच आधी फोन पाहण्याची आणि लगेच अंथरुणातून उठण्याची सवय सोडून द्या. जागं झाल्यावर, स्वतःला पाच मिनिटं द्या. अंथरुणावरच, हात, मान आणि कंबरेला हळूवारपणे स्ट्रेच द्या. ही छोटीशी सवय स्नायूंसाठी, रक्ताभिसरण वाढवण्यासाठी आणि तुम्हाला दिवसभरासाठी प्रचंड ऊर्जा देणारी ठरतील.
हायड्रेशनसाठी वेळ द्या - चहा पिण्यापूर्वी, पाच मिनिटं एक ग्लास कोमट पाणी प्या. रात्रीच्या विश्रांतीनंतर, तुमच्या शरीराला पाण्याची नितांत आवश्यकता असते. यामुळे सर्व अशुद्धता बाहेर काढेल आणि कोणत्याही आहाराशिवाय पचन व्यवस्थित होईल.
'मी-टाइम' - खूप तणावात आहात असं वाटेल तेव्हा सर्वकाही थांबवा आणि पाच मिनिटांचा ब्रेक घ्या. डोळे बंद करा आणि दहा लांब, खोल श्वास घ्या. ऑफिसच्या खुर्चीवर किंवा स्वयंपाकघरात बसून हे करू शकता. पाच मिनिटांचा हा विराम मेंदूसाठी 'रीसेट बटण' म्हणून काम करतो, राग आणि थकवा दूर किंवा कमी करण्यासाठी याची मदत होते.
Sleep Banking : झोपेची बेगमी करता येते ? पैशांसारखी झोपेची बँक शक्य आहे का ?
Night care routine - झोपण्यापूर्वी पाच मिनिटं चेहरा पूर्णपणे धुवा, टोनर लावा आणि चांगलं मॉइश्चरायझर किंवा सीरम लावा. यामुळे त्वचेची काळजी घेतली जाईलच पण 'मी महत्त्वाचे आहे' याची आठवण करून देण्यासाठी ही काही मिनिटं महत्त्वाची आहेत.
उद्यासाठी पाच मिनिटांचं नियोजन - दुसऱ्या दिवशीचा ताण कमी करण्यासाठी, झोपण्यापूर्वी पाच मिनिटं वेळ काढून एक छोटी यादी बनवा. दुसऱ्या दिवसाची महत्त्वाच्या कामांचं नियोजन करा. यामुळे मानसिक ताण पन्नास टक्क्यांनी कमी होईल.
