जाणून घेऊयात त्या 5 सुपरफूडबद्दल जे स्नायूंच्या वाढीसाठी फायद्याचे आहेत.
1) बदाम :
बदाम हे स्नायूंच्या वाढीसाठी फायद्याचे मानले जातात. बदाम खाल्ल्याने स्नायू आणि हाडं मजबूत व्हायला मदत होते. बदाम खाल्ल्यामुळे स्नायूंचं नुकसान कमी होतं. बदामामध्ये फायबरचं प्रमाणही जास्त असतं ज्यामुळे दिवसभर पोट भरलेले राहतं. यामुळे वजनही कमी व्हायला मदत होते. जर तुमच्या शरीरात मांसपेशी वाढत नसतील रोज 10 ते 12 भिजवलेले बदाम खाल्ल्याने स्नायूंची चांगली वाढ होऊ शकते.
advertisement
2) अंडी किंवा चिकन :
जर तुम्ही मांसाहारी असाल तर अंडी आणि चिकन हा तुमच्यासाठी प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत आहे. तुम्ही व्यायाम करत असाल आणि तुम्हाला मसल्स वाढवायचे असतील. तर रोज तुम्ही 3 ते 4 उकडलेली अंडी खाऊ शकता. मात्र अंड खाताना त्यातला पिवळा बलक खाणं टाळा. यामुळे तुमचं वजन वाढणार नाही. स्नायूंच्या वाढीसाठी अंडी खूप फायदेशीर असल्याचे अनेक संशोधनातून सिद्ध झालं आहे. चिकनमध्येही प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात.त्यामुळे शरीराला योग्य त्या प्रमाणात प्रोटिन्स मिळू शकतात.
3) कडधान्ये :
कडधान्यात प्रथिनं ही चांगल्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारात कडधान्यांचं सेवन केल्यास स्नायूंना बळकटी मिळू शकते. राजमा, हरभरे, वाटाण्यांच्या समावेश तुम्ही जेवणात करू शकता. कडधान्यांमध्ये प्रोटिन्सशिवाय फायबर्स, अनेक प्रकारची खनिजं, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे घटक असतात जे स्नायूंच्या वाढीस फायद्याचे ठरतात.
4) डाळी :
कडधान्यं आणि बियांप्रमाणे डाळींतही चांगल्या प्रमाणात प्रथिनं आढळून येतात. मसूराची डाळ ही सर्वात जास्त पौष्टिक आणि प्रथिनांनी समृद्ध मानली जाते. अर्धा कप मसूराच्या डाळीतूनसाधारण 9 ग्रॅमपर्यंत प्रथिनं मिळतात. यावरूनच त्यात असलेल्या प्रथिनांची विपुलता दिसून येते. याशिवाय मसूराच्या डाळीमध्ये कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि खनिजं देखील चांगल्या प्रमाणात आढळून येतात.
5) बिया :
मूर्ती लहाण पण कीर्ती महान असा या बियांचा उल्लेख करता येईल. बिया दिसायला जरी लहान असल्या तरीही त्यात भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वं असतात म्हणूनच बियांचा उल्लेख सुपरफूड केला जातो. भोपळ्याच्या बिया, तुळशीच्या बिया, अंबाडीच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, चिया सीड्स यांचा दैनंदिन आहारात समावेश करता येऊ शकतो. साधारण अर्धा कप बियांमध्ये 18 ग्रॅम पर्यंत प्रथिनं आढळून येतात.