Protein for Vegetarians: शाकाहारी आहात? बिनधास्त खा ‘हे’ पदार्थ; कधीच भासणार नाही प्रोटिन्सची कमतरता
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Sources of Protein for Vegetarians in Marathi: मांसाहारी व्यक्तींना अनेक पदार्थातून प्रथिनं मिळू शकतात. मात्र शाकाहारी व्यक्तींना प्रोटिन्स कुठून मिळवायची असा प्रश्न पडतो. तुम्ही सुद्धा शाकाहारी असाल तर तुम्ही या शाकाहारी पदार्थातून प्रोटिन्स, मिळवू शकता.
मुंबई : आपलं शरीर स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी आपल्या विविध जीवनसत्वं आणि पोषकतत्वांची आवश्यकता असतं. प्रथिनं किंवा प्रोटिन्स ही सुद्धा आपल्या शरीरासाठी प्रचंड महत्त्वाची आहेत. प्रथिनांमुळे शरीराला उर्जा मिळते. ऑक्सिजनला आपण प्राणवायू म्हणतो. हाच प्राणवायू रक्तामार्फत संपूर्ण शरीरात पोहोचवण्याचं महत्त्वांचं काम प्रथिनं करतात. याशिवाय, रोगप्रतिकारक शक्ती वाढवून विविध रोगांविरोधात लढण्या ॲन्टीबॉडीज तयार करण्याचं काम प्रथिनं करतात. आपलं विविध आजारांपासून रक्षण होतं. आपल्या शरीरातील विविध पेशी निरोगी ठेवण्यास आणि नवीन पेशी तयार करण्यातही प्रथिनं महत्त्वांची भूमिका बजातात.स्नायू, केस, त्वचा आणि नखं यांच्या वाढीसाठी प्रथिनांची मदत होते. ज्या व्यक्ती शरीरसौष्ठवांची आवड आहे ते प्रोटिन्स पावडरच्या मदतीने शरीर कमवतात. याचाच अर्थ स्नांयूंच्या ताकदीसाठीसुद्धा प्रथिनं महत्त्वाची आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने असा आहार घ्यायला हवा की, त्यांच्या शरीराला आवश्यक त्या प्रथिनांची पूर्तता होईल. मासांहारी व्यक्तींना अनेक पदार्थातून प्रथिनं मिळू शकतात. मात्र शाकाहारी व्यक्तींना प्रोटिन्स कुठून मिळवायची असा प्रश्न पडतो. तुम्ही सुद्धा शाकाहारी असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
पालेभाज्या (Green Vegetables):
हिरव्या पालेभाज्या विशेषत: पालक आणि ब्रोकोलीत चांगल्या प्रमाणात प्रोटिन्स आढळून येतात. याशिवाय पालेभाज्यांमध्ये असलेली जीवनसत्वं, खनिजं, लोह आणि विविध पोषकतत्वं शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
संपूर्ण धान्ये (Whole Grains):
गहू, तपकिरी तांदूळ किंवा ब्राऊन राईस, ओटस, बार्ली, क्विनोआ अशा धान्यांमध्ये प्रथिनं चांगल्या प्रमाणात आढळून येतात. याशिवाय पूर्ण धान्यांमध्ये असलेल्या विविध पोषकतत्वांमुळे शरीराला विविध फायदे होतात. क्विनोआ मध्ये तर 9 अत्यावश्यक अमीनो ऍसिडने असतात. याशिवाय क्विनोआत इतर पूर्ण धान्यांपेक्षा प्रोटिन्सचं प्रमाण अधिक असतं.
advertisement
नट्स आणि विविध बिया (Nuts And Seeds):
बदाम, आक्रोड, अंबाडीच्या बिया, चिया सीड्स यात प्रथिनं, फायबर आणि हेल्दी फॅट्स चांगल्या प्रमाणात असतात. सुकामेवा किंवा दुधात ओट्स खाणं एक चांगला नाश्ता ठरू शकतं.
advertisement
टोफू आणि टेम्पेह (Tofu and Tempeh):
टोफू आणि टेम्पेह ही सोयाबीन पासून बनलेली असल्याने यात प्रथिनं अधिक प्रमाणात असतात. वेगवेगळ्या पद्धतीने यांचा वापर आहारात करता येऊ शकतो.
सेटेन (Seitan) :
सध्या सेटेन फूडची जोरदार चर्चा सुरू आहे. ज्या व्यक्ती शाकाहारी आहेत आणि त्यांना चांगल्या प्रमाणात अन्नातून प्रथिनं हवी आहेत, अशांसाठी सेटेन फूड हा चांगला पर्याय आहे. पीठातून स्टार्च काढून टाकल्यानंतर उरतो तो ग्लुटेनयुक्त पदार्थ म्हणजे सेटेन. सेटेनमधून तुम्हाला प्रथिनं जरी मिळत असतील तरीही त्यात असलेल्या ग्लुटेनमुळे वजन वाढण्याची भीती आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सेटेनयुक्त पदार्थांचं सेवन करावं.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 05, 2025 1:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Protein for Vegetarians: शाकाहारी आहात? बिनधास्त खा ‘हे’ पदार्थ; कधीच भासणार नाही प्रोटिन्सची कमतरता