मौनं सर्वार्थ साधनम् असं म्हटलं जातं. शांत राहिल्यानं, अनेक गोष्टी साध्य करणं शक्य होतं. शांत राहणं शारीरिक मानसिक आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. ध्यानधारणेनंही मन शांत होतं. प्रसन्न वाटतं. समजून घेऊया काही वेळ मौन पाळणं, शांत राहणं का आवश्यक आहे. मौनाचे आरोग्यकारक फायदे.
Zinc deficiency : झिंकची कमतरता ठरु शकते हानिकारक, वाचा शरीरात जाणवणारे परिणाम
advertisement
दिवसभरात काही वेळ शांत बसण्यानं याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
शांततेचे दहा फायदे -
तणाव कमी करण्यासाठी मदत - शांततेमुळे ताण आणि रक्तदाब कमी होतो, मन शांत होतं.
मानसिक शांती - शांततेमुळे आंतरिक शांती मिळते, यामुळे ध्यान धारणेलाही मदत होते.
मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त : शांत राहिल्यानं मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि नवीन पेशी तयार होण्यास मदत होते.
लक्ष केंद्रित करण्यासाठी उपयुक्त : शांत राहिल्यानं महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते आणि एकाग्रता वाढते.
Hair Mask : हिवाळ्यात कोंड्यापासून सुटका कशी करावी ? हा उपाय करुन पाहा
चांगले विचार - मन शांत असतं तेव्हा नवीन आणि सकारात्मक विचार येतात, ज्यामुळे सर्जनशीलता वाढते.
नातेसंबंध मजबूत करण्यासाठी उपयुक्त - शांत राहून, लक्षपूर्वक ऐकता आणि इतर काय म्हणत आहेत ते समजून घेता, ज्यामुळे नातेसंबंध मजबूत होतात.
आत्मचिंतन - शांत राहिल्यानं स्वतःचे विचार, मूल्यं आणि हेतू समजून घेण्याची संधी मिळते. स्वत:बरोबरचा संवाद महत्त्वाचा आहे.
मानसिक शांती - चोवीस तासांपैकी एक तास नियमितपणे शांत राहिल्यानं मानसिक शांती मिळेल.
