Zinc deficiency : डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, शरीर देतंय खनिजाच्या कमतरतेचे संकेत

Last Updated:

जीवनसत्त्वं आणि खनिजं पुरेशा प्रमाणात नसल्यानं शरीराच्या विविध कार्यात अडथळे येतात.  पण, अनेकदा झिंकसारख्या आवश्यक खनिजांकडे दुर्लक्ष होतं. कोणत्याही आवश्यक पोषक घटकांच्या कमतरतेची लक्षणं स्पष्ट दिसतात. झिंकची कमतरता असेल तर डोळ्यांमधे काही चिन्हं दिसतात.

News18
News18
मुंबई : जीवनसत्त्वं आणि खनिजं म्हणजे शरीरासाठी अत्यावश्यक घटक. कारण शरीराचं काम योग्यप्रकारे व्हावं यासाठी हे सगळे पोषक घटक गरजेचे असतात.
जीवनसत्त्वं आणि खनिजं पुरेशा प्रमाणात नसल्यानं शरीराच्या विविध कार्यात अडथळे येतात.  पण, अनेकदा झिंकसारख्या आवश्यक खनिजांकडे दुर्लक्ष होतं. कोणत्याही आवश्यक पोषक घटकांच्या कमतरतेची लक्षणं स्पष्ट दिसतात. झिंकची कमतरता असेल तर डोळ्यांमधे काही चिन्हं दिसतात.
झिंकची कमतरता असेल तर डोळ्यांमधे काही चिन्हं दिसतात. झिंक म्हणजेच जस्त हे मानवी वाढ, रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूण आरोग्यासाठी आवश्यक असलेलं एक आवश्यक खनिज आहे. प्रथिनं, चरबी आणि डीएनएच्या चयापचयात याचं काम महत्त्वाचं आहे. जखमा भरण्यासाठीही जस्त महत्त्वाचं आणि यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे रोगांशी लढण्यास मदत होते.
advertisement
तसंच, डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी झिंक महत्त्वाचं आहे. आपल्या डोळ्या जस्त-समृद्ध ऊती असतात, विशेषतः रेटिना, रेटिनल पिगमेंट एपिथेलियम (RPE) आणि कोरोइड, या डोळ्यातल्या भागांना रक्तातून पोषक घटक मिळतात.
टेलर अँड फ्रान्सिसमधे प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, झिंकची कमतरता डोळ्याच्या रचनेत आणि कार्यात बदल करू शकते. या बदलांमुळे दृष्टी कमी होऊ शकते आणि रेटिनाचा प्रकाशाला प्रतिसाद बदलू शकतो.
advertisement
यामुळे कोणती लक्षणं दिसून येतात ते पाहूया -
रात्रीचं अंधत्व  - निक्टॅलोपिया - मंद प्रकाशात किंवा अंधारात पाहण्यास अडचण येणं, व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रात्रीचं अंधत्व जाणवू शकतं.
दृष्टी अंधुक होणं: झिंकच्या कमतरतेमुळे सामान्य दृष्टी अंधुक होणं आणि तिरळेपणा होऊ शकतो.
प्रकाश संवेदनशीलता - फोटोफोबिया : प्रकाशामुळे होणारी अस्वस्थता किंवा वेदना हे झिंकच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं.
advertisement
दिसण्यात अडचण: कमी प्रकाश असलेल्या भागात झिंकच्या कमतरतेमुळे दृष्टी समस्या उद्भवू शकतात. कारण डोळयातील पडदा त्याच्या नेहमीच्या कामासाठी आणि नुकसानापासून संरक्षणासाठी झिंकवर जास्त अवलंबून असतो.
या कमतरतेवर मात करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा -
झिंकच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, पूरक आहार महत्त्वाचा आहे. झिंक असलेले पदार्थ पाहूयात.
advertisement
मांस आणि चिकन
मासे
दुग्धजन्य पदार्थ
काजू आणि बिया
अंकुरित गहू
डाळ, वाटाणे आणि बीन्स
आहारात कोणतेही मोठे बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Zinc deficiency : डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, शरीर देतंय खनिजाच्या कमतरतेचे संकेत
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement