अक्षय खन्नाला Dhurandhar मधील त्या सीनसाठी 7 वेळा कानाखाली मारण्यात आलं, त्या सीनची होतेय चर्चा

Last Updated:
Dhurandhar Akshaye Khanna : 'धुरंधर' या चित्रपटातील अक्षय खन्नाच्या पात्राचं कौतुक होत आहे. पण या चित्रपटातील एका सीनसाठी त्याला 7 वेळा कानाखाली मारण्यात आलं होतं.
1/7
 'धुरंधर' हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. रिलीजच्या आठ दिवसांत या चित्रपटाने 239.75 कोटींची दणदणीत कमाई करत सर्वांना थक्क केलं आहे. 'धुरंधर'चा हिरो रणवीर सिंह असला तरी प्रेक्षकांनी मात्र अक्षय खन्नाला खरा हिरो ठरवला आहे.

advertisement
2/7
 'धुरंधर' चित्रपटातील अक्षय खन्नाच्या एन्ट्रीपासून ते एक्झिटपर्यंत प्रत्येक सीन धमाकेदार झाला आहे. रहमान डकैतच्या भूमिकेसाठी अक्षय खन्नाने 100% दिले आहेत. अक्षय खन्नाला स्क्रीनवर पाहताच प्रत्येक थिएटरमध्ये टाळ्या, शिट्यांचा आवाज घुमताना पाहायला मिळत आहे.

3/7
 'धुरंधर' या चित्रपटात 'भाभीजी घर पर है' फेम सौम्या टंडनने रहमान डकैतची पत्नी उल्फतचे पात्र साकारले आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये रहमान आणि उल्फत यांच्या मोठ्या मुलाचे निधन झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे दु:खी आणि नाराज झालेली उल्फत आपल्या पतीच्या रहमान डकैतच्या कानशि‍लात लगावते.

4/7
 'फिल्मीज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत नवीन कौशिक यांनी कानशि‍लात लगावण्याच्या सीनची बॅकस्टोरी सांगितली आहे. नवीन कौशिक म्हणाले,"अक्षय सरांना 7 वेळा कानशि‍लात लगावण्यात आली आहे. ही एक पावरफुल मोमेंट होती. अक्षय खन्नाचा एक वेगळा ऑरा आहे. या चित्रपटासाठी त्यांना खरंतर ऑस्कर मिळायला हवा. आदित्य धर आणि अक्षय यांच्यात या सीनबाबत आधीच बोलणं झालं होतं की कानाखाली मारण्याचा सीन हा चित्रपटाचा एक भाग आहे आणि इमोशनल पद्धतीने तो प्रेझेंट केला जाईल.

5/7
 नवीन कौशिक पुढे म्हणाला,"कानशिलात लगावण्याच्या सीनदरम्यान मी स्वत: सेटवर हजर होतो. शूटिंगदरम्यान अक्षय खन्ना सरांना एक-दोन वेळा कानाखाली मारल्यानंतर हे शूट करणं थांबावं असं मला वाटत होतं. पण अक्षय खन्ना सरांचं मत होतं की जोवर दिग्दर्शकाला परफेक्ट शॉट मिळत नाही तोवर रिटेक्स करायचे".

6/7
 अक्षय खन्ना यांनी 'धुरंधर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काहीही तक्रार न करता कानशि‍लात लगावल्याच्या सीनचं शूटिंग पूर्ण केलं. सौम्याने अक्षय खन्ना यांना तब्बल सात वेळा कानाखाली लगावली. अक्षय खन्नाचा हा सीन सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचं कौतुक होत आहे.

7/7
 अक्षय खन्ना आपल्या डायलॉगपेक्षा डोळ्यांच्या एक्सप्रेशनने जास्त बोलतो. 'धुरंधर' या चित्रपटातील त्याच्या कामाचं कौतुक होण्यामागे त्याने घेतलेली मेहनत खूप महत्त्वाची आहे. खलनायक असून आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांना थक्क केलं आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement