पाकिस्तानी ब्रँडची उत्पादन पुण्यात कशी, लव्ह जिहादनंतर 'कॉस्मेटिक जिहाद'? भाजप आमदाराने मांडला गंभीर मुद्दा

Last Updated:

भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात बनावट सौंदर्य प्रसाधनाचा साठा जप्त करण्यात आला होता, या प्रकरणाचा दाखल दिला

News18
News18
पुणे : राज्यात काही दिवसांपूर्वी लव्ह जिहाद प्रकरणी भाजपच्या नेत्यांनी ठिकाणी हिंदू मोर्चे काढले होते. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी आता कॉस्मेटिक जिहादचा मुद्दा उपस्थितीत केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी बनावटीची सौंदर्य प्रसाधने विक्रीसाठी येताय, हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मुद्दा आहे, असं लांडगे यांनी म्हटलं आहे.
हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी-चिंचवडचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात बनावट सौंदर्य प्रसाधनाचा साठा जप्त करण्यात आला होता, या प्रकरणाचा दाखल दिला.  'लव्ह जिहाद झालं, लँड जिहाद झालं, आता पाकिस्तानी कॉस्मेटिक जिहाद सुरू झालं आहे. म्हणजे, माणसाच्या शरिरावर आता हल्ला केला जात आहे. पाकिस्तानी निर्मित माल शहरात कसा पोहोचला, या मागे कोण आहे, राष्ट्रविघातक कारवायांच्या शोध घेण्याची गरज आहे.  मध्यतंरीच्या काळात आम्ही कारवाया केल्या. पाकिस्तानी बनावटी राज्यात येत असेल तर हे नवीन षडयंत्र आहे, असा आरोपच लांडगे यांनी केला.
advertisement
मध्यंतरीच्या काळात आम्ही कुदळवाडीमध्ये कारवाई केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाने कारवाईचे आदेश दिले होते,  इंद्रायणी नदी प्रदूषण आणि अवैध भंगार व्यवसाय यासंबंधी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस विभागाने कुदळवाडी परिसरात मोठी अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली होती. आम्ही तिथे १ हजार एकर जागा खाली केली होती. अनेक लोकांनी आमच्यावर आरोप केले. पण राष्ट्र सुरक्षा आणि राष्ट्र हितसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असंही लांडगे यांनी ठणकावून सांगितलं.
advertisement
पिंपरी चिंचवड पोलिसांनी मागील दोन तीन वर्षांमध्ये ७० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. त्यामध्ये अनेकांना ताब्यात घेतलं होतं. पुण्यात सापडले. एक महिन्यांपूर्वी काही कोंडव्यामध्ये बॉम्बस्फोटामधील आरोपीही सापडले होते. आता कॉस्मेटिक जिहाद सारखे प्रकरण समोर येत आहे. यासंदर्भात काय कायदेशीर कारवाई झाली, कुणाला अटक केली होती, हा माल कुठून आला होता, याची माहिती समोर आली पाहिजे, अशी मागणी महेश लांडगे यांनी केली.
advertisement
महेश लांडगे यांच्या मागणीची दखल घेत हे प्रकरण गृहखात्याकडे देण्यात येणार आहे. या प्रकरणी विशेष समिती स्थापन केली जाईल. ही समिती योग्य तो अहवाल देईल, त्यानंतर कारवाई केली जाईल, असं आश्वासन नरहरी झिरवळ यांनी दिलं.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पाकिस्तानी ब्रँडची उत्पादन पुण्यात कशी, लव्ह जिहादनंतर 'कॉस्मेटिक जिहाद'? भाजप आमदाराने मांडला गंभीर मुद्दा
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement