सर्वांनी करा आता ‘आवडेल तिथे प्रवास’, एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी पासमध्ये खास सवलत; दर किती?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ज्यांना फिरायच फार वेड आहे, त्यांच्यासाठी खास योजना सुरू केली आहे. ज्यामुळे प्रवाशांना राज्यासोबतच परराज्यातही कमी पैशांत फिरण्याची संधी मिळत आहे.
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ज्यांना फिरायच फार वेड आहे, त्यांच्यासाठी खास योजना सुरू केली आहे. ज्यामुळे प्रवाशांना राज्यासोबतच परराज्यातही कमी पैशांत फिरण्याची संधी मिळत आहे. चार ते सात दिवसांमध्ये प्रवाशांना 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेअंतर्गत प्रवास करता येणार आहे. नेमकी ही योजना कशी आहे, जाणून घेऊया...
महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर चार किंवा सात दिवसांचा प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ‘आवडेल तिथे प्रवास’ ही योजना सुरू केली आहे. आता या योजनेअंतर्गत प्रवासाच्या पासच्या मूल्यात अलीकडेच बदल करण्यात आला आहे. त्यानुसार विविध प्रकारच्या पासचे दर 200 ते 800 रुपयापर्यंत कमी केले आहेत. 5 ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी 50 टक्के सवलतीचे दर या पासमध्ये उपलब्ध आहेत. तर ज्येष्ठांना 60 ते 75 टक्के पर्यंत सवलत देण्यात आली आहे. या पासच्या योजनेमुळे प्रवाशांना आवडेल तिथे प्रवास करणं खूपच सोयीस्कर झाले आहे.
advertisement
साध्या एसटी बसमधून सवलतीच्या प्रवासासाठी पूर्वी 1814 रुपये शुल्क प्रवाशांना मोजावे लागत होते. ते आता 1364 इतके केले आहे. पूर्वीच्या शुल्कात एमएसआरटीसीने 450 रुपयांची कपात केली आहे. तसेच 12 मीटर ई-बस शिवाईच्या पासचे दर देखील 2681 रुपयांवरून 2072 रुपयांपर्यंत कमी केले आहेत. यामध्ये पूर्वीच्या दरात 789 रुपयांनी कपात केली आहे. सर्व प्रकारच्या बसच्या पास शुल्काचे दर स्वस्त करण्यात आल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. लहान मुलांकरिता असलेले तिकीट दर देखील पाच वर्षांपेक्षा जास्त वयाची व १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहेत.
advertisement
चार दिवसांकरिता प्रौढ प्रवाशांच्या पाससाठी
- साधी बस, जुने दर- 1814 नवीन दर- 1364
- शिवशाही बस, जुने दर- 2533 नवीन दर- 1818
- ई- शिवाई बस, जुने दर- 2861 नवीन दर- 2072
मुले जुने दर नवीन दर
- साधी बस, जुने दर- 910 नवीन दर- 685
- शिवशाही बस, जुने दर- 1269 नवीन दर- 911
- ई- शिवाई बस, जुने दर- 1433 नवीन दर- 1038
advertisement
सात दिवसांकरिता प्रौढ प्रवाशांच्या पाससाठी
- साधी बस, जुने दर- 3171 नवीन दर- 2638
- शिवशाही बस, जुने दर- 4429 नवीन दर- 3175
- ई- शिवाई बस, जुने दर- 5003 नवीन दर- 3619
मुले जुने दर नवीन दर
- साधी बस, जुने दर- 1588 नवीन दर- 1194
- शिवशाही बस, जुने दर- 2217 नवीन दर- 1590
- ई- शिवाई बस, जुने दर- 2504 नवीन दर- 1812
advertisement
Location :
Maharashtra
First Published :
December 13, 2025 6:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सर्वांनी करा आता ‘आवडेल तिथे प्रवास’, एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी पासमध्ये खास सवलत; दर किती?









