'त्याने माझ्या मुलीशी लग्न करणाऱ्या प्रयत्न केला', मुंबईच्या पहिल्या डॉनच्या लेकीनं सगळं सांगितलं
- Published by:Sachin S
Last Updated:
'माझ्यावर त्याने आधी बलात्कार केला त्यामुळे घरच्यांच्या शरमेखातर माझं लग्न लावलं. माझ्या आईने विरोध केला होता.
मुंबई: मुंबईचा पहिला डॉन म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या हाजी मस्तानचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. डॉन हाजी मस्तानची लेक हसीन मस्तान मिर्झा हिने एक व्हिडीओ रेकॉर्ड करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच मागणी केली आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंबंधी कायदे कठोर करण्याची मागणी केली आहे. पण, तिने ही मागणी का केली, याबद्दलची माहिती आता समोर आली आहे.
हसीना मस्तान मिर्झा ही डॉन हाजी मस्तानच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी आहे. ती सध्या मुंबईतच राहते. तिचं वयाच्या १२ व्या वर्षी लग्न झालं होतं. तिच्या आईने तिचं लग्न हे नासिर हुसेन नावाच्या तरुणांशी लग्न लावून दिलं. वयाच्या 13व्या वर्षी हसीनला पहिली मुलगी झाली. हसीनच्या आरोपांनुसार, तिचा पती तिला मारहाण करायचा आणि त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार सुद्धा केला. कालांतराने हसीन कोर्टात गेली पण प्रकरणाचं पुढे काहीच झालं नाही. आता हसीनने पुन्हा एक व्हिडिओ शेअर करत न्यायाची मागणी केली आहे.
advertisement
हसीना मिर्झा व्हिडीओमध्ये काय म्हणाली?
'कायदा कठोर नाहीये. लोक गैरवापर करतात. मी 12 वर्षांची असताना बलात्कार झाला. माझं लग्न लावलं.
त्याची आठ लग्न झाली आहेत म्हणून मोदी-शहा यांना विनंती केली आहे. हे सर्व देशवासियांसाठी आहे. मी भीक मागत नाहीये... न्याय मागतेय. तो माझ्या मामाचा मुलगा आहे, ज्याच्याशी माझं लग्न झालं. माझ्याशी लग्न करून त्याने इतरांना सांगितलं की, मी हाजी मस्तानचा मुलगा आहे. माझ्याशी लग्न करण्याआधी 4 लग्न झाली होती.
advertisement
त्याने माझ्या मुलीशी लग्न करण्याचा प्रयत्न केला
'माझ्यावर त्याने आधी बलात्कार केला त्यामुळे घरच्यांच्या शरमेखातर माझं लग्न लावलं. माझ्या आईने विरोध केला होता. लग्न रजिस्टर केलं नव्हतं. इस्लाम पद्धतीने झालं. निकाह नामावर 19 वय दाखवलं. त्याचं नाव नासिर शेख आहे. लग्नानंतर लगेच मी गरोदर झाले. मी अनेकदा घरं सोडलं. दोन वेळा गर्भपात झाला. मुलांना जन्म देण्यासाठी दबाव होता. त्याने माझ्या मुलीशी लग्न करण्याचा प्रयत्न केला. मी केस केली पण पोलिसांनी लक्ष दिलं नाही, असा आरोपीच हसीनाने केला.
advertisement
कर्ज घेऊन केस लढणार
'मी आजारी होती. आर्थिक परिस्थती बिकट होती. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना माहित होतं. त्यांनी मला काम दिलं. थोडे पैसे आले. लोकांना फक्त्त वाटत. हाजी मस्तानची लेक आहे पण त्यांना लोकांचे आशीर्वाद होते म्हणून मी जिवंत आहे. मला आता मांडवली करायची नाहीये त्याला शिक्षा मिळावी. आता मी केस रिओपन करणार आहे. मी आजारी होती म्हणून त्यावेळी कोर्टात जाऊ शकली नाही. पण, आज कर्ज घेऊन केस लढणार आहे' असंही तिने सांगितलं.
advertisement
'माझा बंगला माझ्या आईचा नावावर आहे. पण त्याचं भाडं नासिर शेखला दिलं जातं. मी आता केस रिओपन करणार आहे. मला न्याय हवाय. माझे कागदपत्र माझी प्रॉपर्टी मला हवीये, अशी मागणी हसीनाने केली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 7:26 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
'त्याने माझ्या मुलीशी लग्न करणाऱ्या प्रयत्न केला', मुंबईच्या पहिल्या डॉनच्या लेकीनं सगळं सांगितलं










