प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन, घरातच आढळला मृतदेह
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन झाले आहे. वडिलांवर उपचार सुरू असताना त्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.
Actor Death : मनोरंजनविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. मल्याळम सिनेसृष्टीतील एक तरुण कलाकार, राज्य पुरस्कार विजेता अभिनेता अखिल विश्वनाथ (Akhil Vishwanath) याने आत्महत्या करत आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे. वयाच्या 30 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे. अखिल विश्वनाथ याने 11 डिसेंबर 2025 रोजी केरळमधील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या निधनाने सिनेसृष्टीसह चाहत्यांना आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. साऊथ इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार अखिल विश्वनाथच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अखिल विश्वनाथ या अभिनेत्याने राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. अभिनेत्याची आई गीता या ऑफिसला जात असताना त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. राहत्या घरात अखिल आईला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
अखिल विश्वनाथ हा एक लोकप्रिय अभिनेता होता. त्याला 'मांगंडी' या टेलिफिल्ममधील कामासाठी राज्य सरकारचा बालकलाकार हा पुरस्कारदेखील मिळाला होता. तसेच सनल कुमार शशीधरण यांच्या 'चोला' या चित्रपटाच्या माध्यमातून अखिल विश्वनाथला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती. 'ऑपरेन जावा' या चित्रपटातही अखिलच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती. त्याच्या अनेक चित्रपटांचं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कौतुक झालं आहे.
advertisement
advertisement
अखिल विश्वनाथ एक अभिनेता म्हणून काम करण्यासह एका मोबाईलच्या दुकानात मॅकेनिक म्हणूनही काम करत होता. पण गेल्या काही दिवसांपासून त्याने या दुकानात जाणं बंद केलं होतं. अखिलच्या वडिलांचा तीन महिन्यांपूर्वीच अपघात झाला होता. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखिलवर सध्या कुटुंबाचा आर्थिक खर्च आणि वडिलांचे उपचार करण्याचा ताण होता. त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. पण पोलिसांचा याप्रकरणी तपास सुरू असून ते आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 7:10 PM IST









