Fridge : प्लास्टिकच्या भांड्यात फ्रिजमध्ये अन्न ठेवणं खरंच सुरक्षित आहे का? गृहिणींना हे माहित असायला हवं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का की, फ्रीजमधील थंड तापमानात प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न साठवणे आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे की नाही? अनेक तज्ज्ञांच्या मते, प्लास्टिकचा हा वाढता वापर केवळ पर्यावरणासाठी नाही, तर आपल्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकतो.
मुंबई : आजकाल आपल्या रोजच्या जीवनासाठी तर प्लास्टिक हा एक अविभाज्य भाग बनला आहे. पाणी पिण्याच्या बाटलीपासून ते घरात अन्न साठवण्यापर्यंत, आपण सर्रासपणे प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर करतो. अगदी पाण्याची बाटलीही प्लास्टिकचीच असते. सुक्या गोष्टीच नाही तर ओल्या गोष्टीही आपण प्लास्टिकमध्येच ठेवतो. एवढ नाही तर एखादी उरलेला पदार्थ असेल तर ती आपण प्लास्टिकच्याच डब्यात काढून फ्रिजमध्ये किंवा फ्रिजरमध्ये ठेवतो.
पण, तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का की, फ्रीजमधील थंड तापमानात प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न साठवणे आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे की नाही? अनेक तज्ज्ञांच्या मते, प्लास्टिकचा हा वाढता वापर केवळ पर्यावरणासाठी नाही, तर आपल्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकतो.
चला, प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये अन्न साठवल्याने होणारे संभाव्य धोके आणि यावर उपाय काय आहेत, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊया.
advertisement
1. अन्नात हानिकारक रसायनांचे मिश्रण
जेव्हा अन्न प्लास्टिकच्या डब्यात ठेवले जाते, विशेषतः दीर्घकाळ तेव्हा प्लास्टिकमधील रसायने अन्नात मिसळू लागतात. अनेक प्लास्टिकमध्ये BPA, फ़्थैलेट्स आणि इतर धोकादायक रसायने असतात, जी शरीरासाठी हानिकारक मानली जातात.
धोका कधी वाढतो?
थंड तापमानात ही प्रक्रिया कमी होते, पण जर कंटेनर जुना, खरचटलेला किंवा तुटलेला असेल, तर रसायने बाहेर पडण्याचा धोका वाढतो. विशेषतः गरम आणि आम्लयुक्त पदार्थ ठेवल्यास ही प्रक्रिया खूप जलद होते.
advertisement
2. हार्मोनल असंतुलन
प्लास्टिकमध्ये असलेले BPA आणि काही रसायने शरीरातील इस्ट्रोजेन सारख्या हार्मोन्सची नक्कल करतात. यामुळे शरीराच्या नैसर्गिक जैविक प्रक्रियांमध्ये अडथळा निर्माण होतो. दीर्घकाळ या रसायनांच्या संपर्कात राहिल्यास हार्मोनल असंतुलन, प्रजनन समस्या, थायरॉईड विकार आणि चयापचय समस्या वाढू शकतात.
3. कर्करोगाचा संभाव्य धोका
प्लास्टिकमधील काही रसायने कर्करोगजन्य मानली जातात. जरी थंड तापमानात याचा प्रभाव कमी असला तरी, जर तुम्ही सतत आणि अनेक वर्षांपासून निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकचा वापर करत असाल, तर हा धोका हळूहळू वाढू शकतो.
advertisement
फ्रिजमध्ये प्लास्टिक वापरताना घ्यायची काळजी
जर तुमचे कंटेनर फूड-ग्रेड असतील आणि ते BPA-फ्री असतील, तर थंड तापमानावर त्यांचा वापर करणे तुलनेने सुरक्षित मानले जाते. तरीही, खालील खबरदारी घेणे आवश्यक आहे. कंटेनरच्या खालील बाजूस दिलेले रीसायकलिंग कोड तपासा आणि केवळ 'फूड-ग्रेड' प्लास्टिकचाच वापर करा.
प्लास्टिकमध्ये कधीही गरम अन्न ठेवू नका. उष्णता 'केमिकल लीचिंग'ची प्रक्रिया जलद करते.
advertisement
मायक्रोवेव्ह-सेफ लिहिलेले असले तरी, प्लास्टिकचे कंटेनर मायक्रोवेव्हमध्ये गरम करणे टाळा.
लोणचे, लिंबू किंवा टोमॅटोसारखे जास्त आम्लयुक्त (Acidic) पदार्थ प्लास्टिकमध्ये साठवण्यापासून टाळा, कारण ॲसिड रसायनांना लवकर बाहेर काढते.
जुने, खरचटलेले किंवा तुटलेले कंटेनर वापरणे त्वरित थांबवा.
प्लास्टिक कंटेनर वापरणे पूर्णपणे टाळायचे असल्यास, काचेचे (Glass) किंवा स्टीलचे (Steel) डबे हे फ्रीजमध्ये अन्न साठवण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वात सुरक्षित पर्याय आहेत. तुम्ही जर चांगले आणि BPA-मुक्त प्लास्टिक वापरत असाल, तर त्याचा वापर मर्यादित ठेवा. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने, रसायनांपासून मुक्त असणारे कंटेनर निवडणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 6:52 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fridge : प्लास्टिकच्या भांड्यात फ्रिजमध्ये अन्न ठेवणं खरंच सुरक्षित आहे का? गृहिणींना हे माहित असायला हवं










