दुसरं बाळ येण्याआधीच Bharti Singh करतेय तिसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? हर्ष लिंबाचिया म्हणाला,"मुलगा झाला तर…"
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bharti Singh Harsh Limbachiyaa : भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया लवकरच आपल्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहेत. दरम्यान त्यांच्या पॉडकास्टमध्ये या जोडप्याने तिसऱ्या बाळाचीही प्लॅनिंग करत असल्याचा खुलासा केला आहे.
Bharti Singh Harsh Limbachiyaa : कॉमेडियन भारती सिंह आणि टीव्ही होस्ट हर्ष लिंबाचिया दुसऱ्यांदा आई-वडील होणार आहेत. आधीच एका मुलाचे पालक असलेले हर्ष आणि भारती यावेळी मुलगी व्हावी अशी इच्छा व्यक्त करत आहेत. मात्र अलीकडेच त्यांच्या यूट्यूब चॅनेल ‘भारती टीव्ही’ वरील पॉडकास्टमध्ये हर्षने तिसऱ्या बाळाची प्लॅनिंग सुरू असल्याचं सांगितलं. नुकतंच या जोडप्याने त्यांच्या पॉडकास्टमध्ये सोनाली बेंद्रेला आमंत्रित केलं होतं. या दरम्यान मातृत्वाच्या प्रवासाबद्दल बोलताना सोनाली यांनी सांगितलं की, त्यांना फक्त एकच मूल आहे. यावर भारतीने दुसऱ्यांदा आई होण्याबाबतच्या तिच्या चिंता व्यक्त केल्या. सोनाली यांनी तिला समजावत सांगितलं की भारती आधीपासूनच एक अनुभवी आई आहे. संभाषण पुढे नेत हर्ष म्हणाला,"आम्ही थांबणार नाही, भारती".
"मुलगा झाला तर आम्ही पुन्हा एकदा…"
हर्षच्या या वक्तव्यावर सोनाली आश्चर्यचकित झाल्यावर हर्ष पुढे म्हणाला,"तीन हा माझा लकी नंबर आहे". त्यानंतर भारतीने सविस्तर सांगितलं,"हा म्हणतो आम्ही थांबणार नाही. आम्हाला मुलगी हवी आहे, म्हणून आम्ही ठरवलं की यावेळीही मुलगा झाला तर पुन्हा एकदा प्रयत्न करू. मग मी त्याला विचारलं, तिसरं बाळही मुलगाच झाला तर? तर तो म्हणाला, आपण पुन्हा प्रयत्न करू".
advertisement
हर्ष पुढे म्हणाला,"मुलगी असो किंवा मुलगा, सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की दुसरं मूल होणार नाही. पण जर हेही मुलगाच झाला, तरी मला मुलगीच हवी आहे.”
भारतीने हर्षसोबत 2017 मध्ये काही काळ डेटिंग केल्यानंतर हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलं. 3 एप्रिल 2022 रोजी या जोडप्याने त्यांच्या मुलाचे, लक्ष (लाडाने ‘गोला’) स्वागत केलं. यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारती आणि हर्षने इंस्टाग्रामवर त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती.
advertisement
भारती सिंग सध्या ‘लाफ्टर शेफ्स’ या कुकिंग शोचा तिसरा सीझन होस्ट करत आहे. या शोमध्ये अली गोनी, एल्विश यादव, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, अभिषेक कुमार, कृष्णा अभिषेक, जन्नत जुबैर, गुरमीत चौधरी, देबिना बॅनर्जी आणि विवियन डीसेना यांसारखे अनेक सेलिब्रिटी शेफ सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे, हर्ष ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ चा 11वा सीझन होस्ट करत आहे. या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू, शिल्पा शेट्टी आणि शान हे जज आहेत आणि हा शो SonyLIV वर स्ट्रीम केला जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 7:41 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
दुसरं बाळ येण्याआधीच Bharti Singh करतेय तिसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? हर्ष लिंबाचिया म्हणाला,"मुलगा झाला तर…"











