चौरस आणि सकस आहार असेल तर आपली प्रकृती व्यवस्थित राहते. पण यात काही बदल झाला, पोषक घटकांची कमतरता असेल तर थकवा जाणवू शकतो. अशक्तपणा येऊ शकतो. कारण आहार बदलतो तेव्हा जीवनसत्त्व आणि खनिजांच्या पातळीवर परिणाम होवू शकतो.
बहुतेकांना माहित आहे की जीवनसत्त्वांची कमतरता होऊ शकते, पण कधीकधी आवश्यक खनिजांची कमतरता देखील एक मोठी समस्या बनू शकते. शरीराच्या योग्य कार्यासाठी ही सूक्ष्म खनिजं आवश्यक आहेत.
advertisement
साध्या रक्त तपासणीतून कोणत्या घटकाची कमतरता आहे हे कळू शकतं, पण काही वेळा शरीरात होणारे बदल आधीच याचे संकेत देत असतात. वेळेवर आहारात बदल करून या कमतरता दूर केल्या जाऊ शकतात. स्टार्सइनसाइडरच्या अहवालानुसार, शरीरातल्या काही लक्षणांमुळे, आपल्याला या कमतरता ओळखायला मदत होऊ शकते.
Diet tips : जेवताना पाणी का पिऊ नये ? समजून घेऊया शरीरातलं रसायनशास्त्र
क्रोमियम - क्रोमियमची कमतरता शरीराच्या साखरेचं व्यवस्थापन करण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते आणि वजन कमी करू शकते. क्रोमियम वाढवण्यासाठी मशरूम, हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सूर्यफूल बिया, चणे, काजू आणि गूळ यासारखे पदार्थ फायदेशीर आहेत.
मॅंगनीज - मॅंगनीजची कमतरता दुर्मिळ आहे, पण त्यामुळे हाडांची वाढ बिघडू शकते, प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. मॅंगनीजसाठी हिरव्या भाज्या, बेरी, ओट्स, ब्राऊन राईस, अननस आणि चणे खाणं चांगलं.
फ्लोराइड - फ्लोराईडच्या कमतरतेमुळे दात कमकुवत होऊ शकतात आणि दात किडण्याचा धोका वाढू शकतो.
सोडियम क्लोराईड - सोडियम क्लोराईड म्हणजेच मिठाची कमतरता, बहुतेकदा आहारातील घटकांमुळे नाही तर शरीरातील द्रवपदार्थांच्या असंतुलनामुळे होते. म्हणून, पाणी आणि मीठ संतुलनाकडे लक्ष देणं महत्वाचं आहे.
पोटॅशियम - पोटॅशियमची कमतरता सहसा उलट्या, जुलाब किंवा जास्त लघवीमुळे होते. रताळं, टोमॅटो, गाजर, पालक, केळी, बटाटे, खजूर, मनुका आणि मासे यासारखे पदार्थ खाल्ल्यानं पोटॅशियमची कमतरता भरून निघू शकते.
आयोडीन - आयोडीनच्या कमतरतेमुळे शारीरिक विकास आणि मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. घशाच्या पुढच्या भागात सूज येणं हे एक सामान्य लक्षण आहे. हे टाळण्यासाठी, आयोडीनयुक्त मीठ, समुद्री शैवाल, अंडी आणि हिरव्या भाज्या खाणं महत्वाचं आहे.
मॅग्नेशियम - मॅग्नेशियम अनेक पदार्थांमधे आढळतं, पण तरीही त्याची कमतरता जाणवू शकते. डाळी, काजू, बिया, संपूर्ण धान्य, फळं आणि एवोकॅडो या अन्न घटकांधे फायदेशीर मॅग्नेशियम असतं.
Joints pain : तरुणांमधे वाढतंय सांधे दुखण्याचं प्रमाण, काय आहेत कारणं ?
झिंक - झिंकच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. ऑयस्टर, मांस, बीन्स आणि काजू हे झिंकचे चांगले स्रोत आहेत.
लोह - लाल रक्तपेशींसाठी लोह आवश्यक आहे. लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येऊ शकतो. बदाम, काजू, राजमा, पालक, ब्रोकोली, भोपळ्याच्या बिया आणि मांस यांसारख्या पदार्थांमधे लोह भरपूर प्रमाणात असतं.
सेलेनियम - सेलेनियमची कमतरता दुर्मिळ आहे, पण सेलेनियमच्या कमतरतेमुळे थकवा, स्नायू कमकुवत होणं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं अशी लक्षणं दिसू शकतात. यासाठीचे चांगले स्रोत म्हणजे ब्राझील नट्स, मशरूम, संपूर्ण धान्य, सॅल्मन आणि अंडी.
