Diet tips : जेवताना किंवा जेवल्यानंतर पाणी प्यावं की नाही ? जेवणादरम्यान पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ? जेवताना पाणी प्यायल्यानं पचनावर परिणाम होतो का ?
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदात खाण्यापिण्याचे काही नियम सांगितले आहेत. त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. आपल्यापैकी अनेकांना जेवण संपताच ग्लासभर पाणी पिण्याची सवय असते. पण, ही छोटीशी सवय पचनक्रियेवर गंभीर परिणाम करू शकते. जेवणानंतर लगेच पाणी पिणं हानिकारक का मानलं जातं आणि त्यामागील कारणं काय आहेत ते समजून घेऊया.
मुंबई : जेवताना पाणी पिऊ नये घराघरातली शिकवण. यामागचं विज्ञान समजून घेण्याची गरज आहे कारण यामुळे शरीरात काही परिणाम जाणवत असतात.
भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदात खाण्यापिण्याचे काही नियम सांगितले आहेत. त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. आपल्यापैकी अनेकांना जेवण संपताच ग्लासभर पाणी पिण्याची सवय असते. पण, ही छोटीशी सवय पचनक्रियेवर गंभीर परिणाम करू शकते. जेवणानंतर लगेच पाणी पिणं हानिकारक का मानलं जातं आणि त्यामागील कारणं काय आहेत ते समजून घेऊया.
advertisement
पचनक्रिया मंदावणं - पोटातील पाचक एंझाइम आणि गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजेच जठर रस पाण्यानं पातळ होतात, ज्यामुळे अन्नाचं पचन मंदावतं. यामुळे गॅस, आम्लता, पोटफुगी आणि छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, जेवणानंतर लगेच पाणी पिणं टाळावं.
advertisement
इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम - जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यानं शरीरात इन्सुलिनची पातळी वाढू शकते. अन्न योग्यरित्या पचत नाही तेव्हा ते ग्लुकोजमधे रूपांतरित होतं आणि चरबी म्हणून साठवलं जातं. यामुळे केवळ वजन वाढण्याचा धोका वाढतोच, पण रक्तातील साखरेच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतो.
advertisement
पौष्टिक घटकांचा अभाव - पचनादरम्यान, जीवनसत्त्वं, खनिजं आणि प्रथिनं यांसारखे पोषक घटक आतड्यांमधे शोषले जातात. पचन योग्य नसेल तर शरीर अन्नातील पोषक घटक योग्यरित्या शोषू शकत नाही. यामुळे अशक्तपणा येऊ शकतो.
जेवणाच्या तीस मिनिटं आधी आणि जेवणानंतर किमान चाळीस मिनिटांनी पाणी प्यावं. जेवताना जर तुमचा घसा कोरडा होत असेल तर कोमट पाणी किंवा ताक एक किंवा दोन घोट घेऊ शकता. पचन सुधारण्यासाठी आणि पोषक घटकांचं चांगलं शोषण करण्यासाठी अन्न पूर्ण आणि व्यवस्थित चावणं आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 11:29 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diet tips : जेवताना किंवा जेवल्यानंतर पाणी प्यावं की नाही ? जेवणादरम्यान पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ? जेवताना पाणी प्यायल्यानं पचनावर परिणाम होतो का ?