केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि केसांच्या चांगल्या वाढीसाठी हर्बल तेल हा चांगला पर्याय आहे. डॉ. हंसाजी यांनी यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओत केसांची मुळं मजबूत करण्यासाठी तेल मालिश करणं आवश्यक असल्याचं म्हटलंय.
मालिश केल्यानं टाळूमधे रक्ताभिसरण वाढतं, ज्यामुळे केसांना योग्य पोषण मिळतं आणि केसांची वाढ चांगली आणि वेगानं होते. यासाठी घरीही एक खास तेल तयार करू शकता.
advertisement
तेल तयार करण्यासाठी, नारळाच्या तेलात थोड्या प्रमाणात कढीपत्ता आणि जास्वंदाची फुलं घाला आणि उकळवा. आठवड्यातून दोन-तीन वेळा केसांच्या मुळांना हे तेल लावा, मसाज करा आणि कमीत कमी एक तास तसंच राहू द्या. यामुळे रक्ताभिसरण वाढेल आणि केसांची वाढ जलद होईल.
Diabetes : मधुमेहींसाठी पौष्टिक पर्याय, आहाराकडे द्या विशेष लक्ष, या टिप्सचा होईल फायदा
प्रोटीन हेअर मास्क
केस मजबूत करण्यासाठी प्रोटीन म्हणजेच प्रथिनं आवश्यक आहेत. अंकुरलेले मूग, मेथीचे दाणे आणि दही मिसळून हेअर मास्क तयार करता येतो. हेअर मास्क टाळू आणि केसांना लावा आणि तीस-चाळीस मिनिटांनी स्वच्छ धुवा. आठवड्यातून एकदा लावलेला हा मास्क केसांना खोलवर पोषण देईल आणि तुटण्यापासून रोखेल.
आवळा-रीठा शाम्पू
बाजारात उपलब्ध असलेले रासायनिक शाम्पू केसांना कमकुवत करू शकतात. यासाठी डॉ. हंसाजी यांनी घरी नैसर्गिक शॅम्पू बनवण्याचा सल्ला दिला आहे. या शाम्पूसाठी आवळा आणि रीठा पावडर समान प्रमाणात पाण्यात उकळा. तयार केलेलं पाणी गाळून घ्या आणि ते नैसर्गिक शॅम्पू म्हणून वापरा. यामुळे टाळू स्वच्छ होईलच पण केसही मजबूत होतील. हा शॅम्पू फक्त एक महिना वापरा आणि तुम्हाला फरक दिसून येईल.
Kidneys : किडनीच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या टिप्स, ही पथ्यं पाळा, गंभीर आजारांना दूर ठेवा
आंबवलेल्या तांदळाच्या पाण्यानं केस स्वच्छ धुवा.
तांदळाचं पाणी केसांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. तांदूळ धुवा, एका भांड्यात पाणी भरा आणि रात्रभर तसंच राहू द्या. दुसऱ्या दिवशी शॅम्पू केल्यानंतर ते केस धुण्यासाठी वापरा. यामुळे केस मऊ, चमकदार आणि मजबूत होतात.
तमालपत्र
केसांची काळजी घेण्यासाठी तमालपत्र वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. तमालपत्र पाण्यात उकळून सीरम बनवा आणि ते स्प्रे बाटलीत भरून ठेवा. झोपण्यापूर्वी टाळूला लावा आणि हलक्या हातानं मसाज करा. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळेल आणि वाढ वेगानं होईल.
निरोगी केसांसाठी या बाह्य उपायांबरोबरच संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली देखील आवश्यक आहे.
यासाठी आहारात बदाम, पालक, जवस आणि मसूर यांचा समावेश करा. शिवाय, पुरेशी झोप घ्या आणि तणावाचं व्यवस्थापन करायला शिका. सहा महिने सातत्यानं या पाच टिप्स फॉलो केल्या तर फक्त सहा महिन्यांत केसांत लक्षणीय फरक दिसून येईल. यामुळे केसांशी संबंधित समस्या दूर होतीलच, शिवाय केसांची वाढही वेगवान होईल.