Kidneys : किडनीच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या टिप्स, ही पथ्यं पाळा, गंभीर आजारांना दूर ठेवा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आहार बदलल्यानं ज्या अंतर्गत अवयवांवर परिणाम होतो त्यातीलच एक म्हणजे मूत्रपिंड. मूत्रपिंडं योग्यरित्या काम करत नसतील तर रक्तदाब वाढणं, सूज येणं, थकवा येणं आणि मूत्रपिंड निकामी होणं यासारख्या अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. मूत्रपिंंडं दीर्घकाळ निरोगी ठेवायची असतील तर काही पदार्थांपासून दूर राहणं अत्यंत महत्वाचं आहे.
मुंबई : मूत्रपिंड म्हणजे आपल्या शरीरातल्या अनेक महत्त्वाच्या अवयवांपैकी एक. रक्त स्वच्छ करुन विषारी पदार्थ काढून टाकणं आणि पाणी-सोडियम संतुलन राखण्यासाठी मूत्रपिंडांचं कार्य महत्त्वाचं आहे.
आहार बदलल्यानं ज्या अंतर्गत अवयवांवर परिणाम होतो त्यातीलच एक म्हणजे मूत्रपिंड. मूत्रपिंडं योग्यरित्या काम करत नसतील तर रक्तदाब वाढणं, सूज येणं, थकवा येणं आणि मूत्रपिंड निकामी होणं यासारख्या अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. मूत्रपिंंडं दीर्घकाळ निरोगी ठेवायची असतील तर काही पदार्थांपासून दूर राहणं अत्यंत महत्वाचं आहे.
advertisement
- जास्त मीठ खाणं - मीठामधील सोडियमचा थेट किडनीवर परिणाम होतो. जास्त मीठ खाल्ल्यानं रक्तदाब वाढतो आणि किडनी रक्त फिल्टर करण्यासाठी जास्त काम करतात. हे टाळण्यासाठी, पॅकेज्ड फूड, चिप्स, स्नॅक्स, लोणचं आणि प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजेच प्रोसेस्ड फूड टाळा. मीठाचं सेवन प्रमाणात ठेवा. चवीसाठी लिंबू, औषधी वनस्पती किंवा मसाल्यांचा वापर करा.
advertisement
- साखरेचं प्रमाण जास्त असलेली पेयं टाळा. कोल्ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस आणि गोड एनर्जी ड्रिंक्समधे भरपूर साखर असते. यामुळे शरीरातील चरबी वाढते आणि मधुमेहाचा धोका वाढतो. किडनीसाठी हे अत्यंत हानिकारक आहे. हे टाळण्यासाठी, ताज्या फळांचा रस किंवा नारळ पाणी प्या. साखरयुक्त पेयांपेक्षा साधं पाणी किंवा हर्बल चहा हा पर्याय निवडा.
- जास्त प्रमाणात लाल मांस खाणं टाळा. मटण आणि गोमांस यांसारख्या लाल मांसामधे प्रथिनं जास्त असतात.
advertisement
जास्त प्रथिनांमुळे मूत्रपिंडांवर दबाव येतो आणि यूरिक ऍसिड वाढतं, ज्यामुळे मूत्रपिंडात दगड तयार होण्याचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी, लाल मांसाऐवजी मसूर, चीज, अंडी किंवा मासे यांसारखे हलकी प्रथिनं असलेले पदार्थ खा. आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदाच लाल मांस खा. मूत्रपिंडाचा त्रास असेल तर ते खाणं पूर्णपणे टाळा.
advertisement
- तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं टाळा. फास्ट फूड, पॅकेज्ड स्नॅक्स आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांत ट्रान्स फॅट्स, मीठ आणि प्रिझर्वेटिव्ह असतात यामुळे किडनीला हानी होऊ शकते. म्हणून, तळलेले पदार्थ नेहमी टाळा. हे टाळण्यासाठी, ताजं, घरी शिजवलेलं अन्न खा. तळलेल्या पदार्थांपेक्षा ग्रील्ड किंवा उकडलेल्या पदार्थांना प्राधान्य द्या. पॅकेज्ड पदार्थांचे लेबल्स वाचा आणि जास्त सोडियम असलेले पदार्थ टाळा.
advertisement
- खूप मसालेदार पदार्थ खाणं आणि वारंवार वेदनाशामक औषधं घेणं यामुळे मूत्रपिंडांना हळूहळू नुकसान होऊ शकतं. यामुळे मूत्रपिंडांची फिल्टरिंग क्षमता देखील कमकुवत होऊ शकते. हे टाळण्यासाठी, मसाल्यांचा वापर मर्यादित प्रमाणात करा. वेदना होत असतील किंवा ताप येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच औषधं घ्या. हळद, आले किंवा कोमट पाणी यासारखे नैसर्गिक उपाय वापरा.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 8:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kidneys : किडनीच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या टिप्स, ही पथ्यं पाळा, गंभीर आजारांना दूर ठेवा









