Gas : ताण आल्यामुळे पोट बिघडू शकतं ? वाचा हृदय - आतड्यांची गोष्ट
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
खाण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, ताणतणाव आणि बद्धकोष्ठता ही देखील प्रमुख कारणं असू शकतात. आयबीएस (इरिटेबल बाउल सिंड्रोम) किंवा पोटाशी संबंधित इतर समस्यांमुळेही गॅस होऊ शकताे. यासाठी जीवनशैलीतल्या काही सवयीत बदल केले तर पोट फुगण्याची समस्या नियंत्रित केली जाऊ शकते.
मुंबई : आपल्यापैकी अनेकांना पोटाच्या तक्रारी जाणवतात. काहीजणांना एखाद्या गोष्टीचा ताण आल्यावर पोटावर परिणाम जाणवतो. काहींना जेवल्यानंतर पोट फुगणं, जडपणा किंवा गॅसचा त्रास होतो.
बहुतेकदा पचनाच्या समस्यांमुळे पोट फुगणं, गॅसेसची समस्या जाणवते पण हे वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. यासाठी काही सवयीत बदल केले तर पोट फुगण्याची समस्या नियंत्रित केली जाऊ शकते.
पोटात जास्त गॅस कशामुळे होतो ?
- खाताना किंवा पिताना हवा गिळली जाणं.
- विशिष्ट प्रकारचे कार्बोहायड्रेट्स, आणि आतड्यांत न पचणारे बॅक्टेरिया
advertisement
- खाण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, ताणतणाव आणि बद्धकोष्ठता ही देखील प्रमुख कारणं असू शकतात.
- आयबीएस (इरिटेबल बाउल सिंड्रोम) किंवा पोटाशी संबंधित इतर समस्यांमुळेही गॅस होऊ शकताे.
आतड्यांचं आरोग्य आणि हृदयाचं आरोग्य एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत. त्यामुळे आतड्यांच्या आरोग्याचा हृदयाच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. याला वैज्ञानिक भाषेक Gut Heart axis म्हटलं जातं. आतड्यांतील बॅक्टेरिया शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी मदत करू शकतात. 2024 च्या हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासात हे निरीक्षण आढळून आलं आहे.
advertisement
पोटात गॅस झाल्यावर करण्याचे उपाय -
पोटात गॅस झाल्यावर नाभीच्या किंचित वर, अंगठा आणि पहिल्या बोटाच्या दरम्यान किंवा घोट्याजवळ, गुडघ्याच्या खाली चार बोटांनी, पोटरीच्या बाहेरील काठाजवळ अॅक्युप्रेशर पॉइंट दाबला तर गॅसच्या समस्येपासून तात्काळ आराम मिळेल. या पॉइंट्सवर हलक्या हातानं मालिश केल्यानं गॅस आणि पोटफुगीपासून तात्काळ आराम मिळतो.
advertisement
गॅस होत असेल तर काय टाळावं ?
- जास्त मसालेदार आणि तळलेले पदार्थ, बीन्स, कोबी, मसूर, सोडा, अल्कोहोल आणि कॉफी टाळा.
- जास्त फायबर असलेले पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ आणि पचण्यास कठीण असलेले पदार्थ टाळा. - जेवणासोबत जास्त पाणी पिणं टाळा, जेवल्यानंतर लगेच झोपू नका.
- हळूहळू खा
काहींना लवकर किंवा पटापट खाण्याची सवय असते. त्यामुळे जास्त खाण्याची आणि पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. म्हणून, प्रत्येक घास नीट चावून खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे पोटफुगीचं प्रमाण कमी होऊ शकतं.
advertisement
- कार्बोनेटेड पेयं टाळा
सॉफ्ट ड्रिंक्स किंवा फिजी ड्रिंक्सनी ताजंतवानं वाटू शकतं, पण त्यातील वायू आणि साखर पोटात वायू अडकवू शकते. यामुळे थोड्या काळासाठी ऊर्जा वाढू शकते पण नंतर पोटदुखी, जडपणा आणि पोट फुगणं असा त्रास जाणवू शकताे. खरोखरच ताजंतवानं वाटण्याची गरज असेल, तर लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा साधं पाणी पिणं हा एक चांगला पर्याय आहे.
advertisement
- योग्य प्रमाणात खा.
जास्त प्रमाणात खाणं हे पोटफुगीचं सर्वात मोठं कारण आहे. पोटभर जेवतो तेव्हा पचनसंस्थेवर ताण येतो आणि अन्न वेळेवर पचत नाही. म्हणून, जेवढी भूक लागेल तितकंच खा. जास्त खाणं टाळण्यासाठी लहान प्लेट वापरा.
- गॅस निर्माण करणारे पदार्थ मर्यादित करा.
काही पदार्थांमुळे नैसर्गिकरित्या गॅस निर्माण होतो. बीन्स, मसूर, चणे, कोबी आणि ब्रोकोली हे पदार्थ पूर्णपणे टाळण्याची गरज नाही, कारण यात पौष्टिक घटक असतात. परंतु त्यांचं प्रमाण नियंत्रित करणं महत्वाचं आहे. हे पदार्थ मर्यादित प्रमाणात खाल्ल्यानं गॅस आणि पोटफुगी कमी होण्यास मदत होते.
advertisement
- जेवणानंतर थोडा वेळ फिरा.
जेवणानंतर लगेच झोपल्यानं किंवा खुर्चीवर बसल्यानं पचनक्रिया मंदावते. जेवणानंतर दहा ते पंधरा मिनिटं थोडं चाला, वेगानं नको. हळू चालल्यानं पचन सुधारतं, अन्न पचण्यास मदत होते आणि गॅस तयार होण्याचं प्रमाण कमी होते.
- भरपूर पाणी प्या
शरीराला हायड्रेट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दिवसभर पुरेसं पाणी पीत नसाल तर पचनसंस्था मंदावते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटफुगीसारख्या समस्या उद्भवतात. दिवसभरात सात-आठ ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. जेवताना जास्त पाणी पिणं टाळा.
- ताणतणाव व्यवस्थापन.
पोटफुगी ही फक्त अन्नाशी संबंधित समस्या नाही, ताणतणावामुळेही हा त्रास जाणवू शकतो. जास्त ताणामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि गॅस आणि पोटफुगीसारख्या समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत, योगा, ध्यान किंवा संगीत ऐकणं याची मदत घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 12:01 PM IST









