Women Health : योग्य आहार, नियमित तपासणी, स्त्रियांसाठी खास हेल्थ - डाएट टिप्स
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
एक निरोगी स्त्री निरोगी कुटुंब आणि राष्ट्र निर्माण करते. पण जिच्या खांद्यावर ही जबाबदारी असते तिच्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणूनच, चाळीस किंवा पन्नस वर्षांच्या वयापर्यंत, महिलांना गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं.
मुंबई : घरातल्या प्रत्येकाचं आरोग्य स्त्रीच्या हाती असतं. पण तिच्या आरोग्याकडे अनेकदा योग्य लक्ष दिलं जात नाही. असं म्हणतात, एक निरोगी स्त्री निरोगी कुटुंब आणि राष्ट्र निर्माण करते. पण जिच्या खांद्यावर ही जबाबदारी असते तिच्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणूनच, चाळीस किंवा पन्नस वर्षांच्या वयापर्यंत, महिलांना गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं.
महिलांच्या आरोग्यात बालवयापासूनच काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं महत्वाचं आहे, जेणेकरून वृद्धापकाळातही त्यांचं आरोग्य मजबूत राहील.
- वयाच्या बाराव्या वर्षी मुलींचं हिमोग्लोबिन बारा असलं पाहिजे. या वयात पौष्टिक आहार, लोह आणि हिरव्या भाज्या असलेला आहार आवश्यक आहे. योग्य आहारामुळे निरोगी शरीराचा पाया रचला जातो.
advertisement
विसाव्या वर्षात हाडांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. कारण वीस ते तीस वयोगटात हाडांची निर्मिती सर्वात वेगानं होते. यासाठी कॅल्शियम, प्रथिनं आणि व्हिटॅमिन डी समृद्ध आहार घेणं गरजेचं आहे. योग, खेळ आणि नियमित व्यायामामुळे हाडं मजबूत राहण्यास मदत होईल.
जीवनशैलीतील आजारांचा धोका साधारण तीस ते चाळिशीच्या टप्प्यात जाणवू शकतो. या वयात व्यायाम, संतुलित आहार आणि आरोग्य तपासणी आवश्यक आहे. लठ्ठपणा, मधुमेह आणि हार्मोनल असंतुलन टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी आवश्यक करा.
advertisement
वयाची पन्नाशी जवळ आली की साधारण रजोनिवृत्तीची लक्षणं दिसू लागतात. याच काळात कर्करोगाविषयी दक्षता घेणं आवश्यक आहे. रजोनिवृत्तीनंतर, महिलांना हृदयरोग, संधिवात, मधुमेह आणि अशक्तपणाचा धोका वाढतो.
अंदाजे 80% महिलांमधे व्हिटॅमिन डीची कमतरता असते. त्यामुळे सूर्यप्रकाशात जाणं आणि आहाराकडे लक्ष द्या. सर्व्हायकल कॅन्सर रोखण्यासाठी एचपीव्ही लस घेणं गरजेचं आहे, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. २५ वर्षांनंतर महिलांनी स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीबद्दल जागरूक असलं पाहिजे. अंडाशयाच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी वर्षातून एकदा पेल्विक अल्ट्रासाऊंड करणं आवश्यक आहे. योग्य आहार, व्यायाम, शारीरिक-मानसिक आरोग्याचीही देखभाल स्त्रियांसाठी आवश्यक आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 5:24 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Women Health : योग्य आहार, नियमित तपासणी, स्त्रियांसाठी खास हेल्थ - डाएट टिप्स