TRENDING:

Brain Tumour झाल्यास शरीर देतं संकेत; ही लक्षणं जाणवत असतील तर करू नका दुर्लक्ष

Last Updated:

सर्वच ट्यूमर कॅन्सर नसले तरीही त्याचे योग्य वेळी निदान आणि उपचार झाले नाही तर त्या ट्यूमरचे कॅन्सरमध्ये रुपांतर व्हायला वेळ लागत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अनेक गंभीर आजारांमध्ये कॅन्सर हा अतिशय जीवघेणा आजार आहे. दर वर्षी जगभरात लाखो रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू होतो. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी केमोथेरपी, रेडिएशन आणि सर्जरी यांचा वापर केला जातो. कॅन्सरचे पहिल्या टप्प्यात निदान झाले तर त्यावर प्रभावी उपचार करणे शक्य आहे. स्किन कॅन्सर, ब्लड कॅन्सर असे कॅन्सरचेही वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातला ब्रेन कॅन्सर हा दुर्मीळ प्रकार समजला जातो.
सर्वच ट्यूमर कॅन्सर नसले तरीही त्याचे योग्य वेळी निदान आणि उपचार झाले नाही तर त्या ट्यूमरचे कॅन्सरमध्ये रुपांतर व्हायला वेळ लागत नाही.
सर्वच ट्यूमर कॅन्सर नसले तरीही त्याचे योग्य वेळी निदान आणि उपचार झाले नाही तर त्या ट्यूमरचे कॅन्सरमध्ये रुपांतर व्हायला वेळ लागत नाही.
advertisement

साधारणतः शरीरातील कोणत्याही अवयवात ट्यूमर असल्यास त्याला कॅन्सर समजले जाते. ब्रेन ट्यूमरच्या बाबतीतही असाच समज आहे. मेंदूत गाठ आली तर ती कॅन्सरचीच असते असं नाही. मेंदू किंवा पाठीच्या कण्यातल्या कोणत्याही भागात ट्यूमर तयार होऊ शकतो. सर्वच ट्यूमर कॅन्सर नसले तरीही त्याचे योग्य वेळी निदान आणि उपचार झाले नाही तर त्या ट्यूमरचे कॅन्सरमध्ये रुपांतर व्हायला वेळ लागत नाही.

advertisement

Uric Acid: युरिक ॲसिड वाढवण्यासाठी या डाळी ठरतात कारणीभूत, पाहा तज्ज्ञ काय सांगतात

ब्रेन ट्यूमरची लक्षणे अतिशय किरकोळ असतात. डोकेदुखी हे असेच एक सामान्य लक्षण आहे. सातत्याने डोकेदुखीची समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ब्रेन ट्यूमरचे 130 हून अधिक प्रकार आहेत. कॅन्सर नसलेल्या ब्रेन ट्यूमरला बेनाइन ब्रेन ट्यूमर असं म्हटलं जातं. मेंदूत पेशींची असामान्य वाढ झाल्याने हा ट्यूमर होतो. मेंदू किंवा पाठीच्या कण्यातल्या कोणत्याही भागात ट्यूमर तयार होऊ शकतो. ज्या पेशींमध्ये असामान्य वाढ होऊन ट्यूमर तयार झाला आहे, त्यावरून त्याला नाव दिलं जातं.

advertisement

ब्रेन ट्यूमरची लक्षणे

बऱ्याचदा ब्रेन ट्यूमर जीवघेणा ठरू शकतो. त्याचं निदान खूप कठीण असतं. वारंवार डोकेदुखी आणि समन्वयाच्या अभावाची समस्या ही ब्रेन ट्यूमरची दोन सामान्य लक्षणं असू शकतात. प्रौढ व्यक्ती आणि लहान मुलांमध्ये ब्रेन कॅन्सरची लक्षणं वेगवेगळी असतात. लहान मुलाला ब्रेन ट्यूमर झाला असल्यास त्याला समन्वयाचा अभाव, डोक्याच्या आकारात अल्पसा बदल, अति तहान लागणं, वारंवार लघवीला जाणं, सातत्यानं किंवा तीव्र डोकेदुखी, चव आणि वास समजण्यास अडचण येणं, दृष्टी अंधूक होणं, चक्कर येणं, थकवा येणं, जुलाब आणि उलट्या होणं ही लक्षणं दिसू शकतात.

advertisement

त्याचबरोबर सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, जुलाब किंवा उलटी होणं, बोलताना अडचण जाणवणं, स्मरणशक्तीशी संबंधित समस्या, चव आणि वास समजण्यात अडचणी, हातापायाला मुंग्याला येणं ही लक्षणं प्रौढ व्यक्तींमध्ये दिसून येतात.

18 की 80, कोणत्या वयातील महिला असतात सर्वांत उत्साही? 99% पुरूषांना माहित नाही उत्तर

ब्रेन ट्यूमरचे प्रकार

ब्रेन ट्यूमरचेही सौम्य आणि तीव्र असे दोन प्रकार आहेत. सौम्य ब्रेन ट्यूमर हळूहळू वाढतो आणि मेंदूच्या एखाद्या विशिष्ट भागाला इजा करतो. मेनिन्जिओमा, वेस्टिब्युलर श्वानोमा आणि पिट्युटरी एडिनोमा हे सौम्य ब्रेन ट्यूमरचे प्रकार आहेत. यात मेनिन्जिओमा हा ब्रेन कॅन्सरचा प्रकार खूपच घातक आहे. हा वेगानं पसरतो आणि मेंदूवर हल्ला करतो.

advertisement

न्यूरोब्लास्टोमा, काँड्रोसार्कोमा आणि मेड्युलोब्लास्टोमा हे मेंदूच्या आसपासच्या भागात होणारे ट्यूमरही धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे कोणतीही लक्षणं किंवा शारीरिक समस्या जाणवत असतील तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Brain Tumour झाल्यास शरीर देतं संकेत; ही लक्षणं जाणवत असतील तर करू नका दुर्लक्ष
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल