18 की 80, कोणत्या वयातील महिला असतात सर्वांत उत्साही? 99% पुरूषांना माहित नाही उत्तर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
एका वयानंतर आपण किशोरवयीन मुलांप्रमाणे ऊर्जावान राहू शकत नाही. याच पार्श्वभूमीवर आज आपण कोणत्या वयातील महिला सर्वाधिक उत्साही असतात ते जाणून घेऊया.
नवी दिल्ली: सध्याच्या घडीला पुरूष आणि महिला दोघांनाही त्यांच्या फिटनेसची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने पुरेशी झोप घेणे आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. मात्र फिटनेसमध्ये आपले वय देखील महत्वाची भुमिका पार पाडतं. एका वयानंतर आपण किशोरवयीन मुलांप्रमाणे ऊर्जावान राहू शकत नाही. याच पार्श्वभूमीवर आज आपण कोणत्या वयातील महिला सर्वाधिक उत्साही असतात ते जाणून घेऊया.
खरंतर महिलांचे शरीर पुरूषांच्या शरीरापेक्षा खूप वेगळे असते. त्यांच्या आवडीनिवडी, विचार, आनंद, प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. सामान्यतः महिलांबाबत असा विचार केला जातो की त्यांना समजणे अतिशय अवघड आहे. मात्र त्यांच्या उत्साहावर त्यांचे वय कशा पद्धतीने प्रभाव पाडतो पाहूया.
advertisement
प्रॅक्टो डॉट कॉमवर डॉक्टर अमित नैले यांनी सांगितल्यानुसार महिलांमधील ऊर्जा आणि त्यांचे वय यामध्ये सरळ कोणताही संबंध नाही. यावर इतर काही घटक प्रभाव पाडत असतात. यामध्ये वयाबरोबरच हार्मोलन बदल, नातेसंबंध, खाजगी अनुभव आणि फिटनेस एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. महिलांमधील ऊर्जेच्या बाबतीत कोणतीही एक गोष्ट संपूर्ण महिलावर्गाला लागू होईल असे नाही. तथापि, ते काही गटांनुसार विभागले जाऊ शकते.
advertisement
युवा अवस्था
18 ते 20 या वयोगटातील महिला अधिक उत्साही असतात. या वयात त्यांना प्रत्येक गोष्टीबाबत कुतूहल असते. अशा परिस्थितीत त्यांना अनेक गोष्टींचा अनुभव घ्यायचा असतो. असे या वयाच्या मुलांमध्येही दिसून येते. या वयातील मुले सर्वाधिक उत्साही असतात.
20 ते 35 वयोगट
या वयोगटातील महिला सर्वांत जास्त ऊर्जावान असतात. या वयातील बहुतांश महिला आयुष्यात सेटल झालेल्या असतात. त्या आपल्या जोडीदारासह अनेक गोष्टींचा अनुभव घेतात. ते एकमेकांचे ऊर्जास्त्रोत बनतात. तथापि, जोडीदाराबरोबर जर चांगले संबंध नसतील तर जीवन कठीण होऊन जाते.
advertisement
35 ते 45 वयोगट
35 पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांचा हा महत्वाचा काळ असतो. या काळात त्यांनी आपल्या जोडीदारासह आयुष्यातील वेगळा टप्पा सुरू केलेला असतो. चाळीशीनंतर या महिलांमध्ये मेनोपॉजचा काळ सुरू होतो. त्यांच्या शरीरात मोठे हार्मोनल बदल होत असतात. याचा त्यांच्या ऊर्जेवरही परिणाम होत असतो. मात्र अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की जर घरातील वातावरण आनंदी असेल तर या महिलांच्या ऊर्जेवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो.
advertisement
45 ते 50 वयोगट
अनेक संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की 45 ते 50 वयोगटातील महिला मेनोपॉजनंतर अधिक ऊर्जावान होतात. या वयोगटातील महिलांची ऊर्जा एखाद्या तरूण महिलेप्रमाणे असते. अशावेळी त्यांच्या जोडीदाराचा आधार अतिशय महत्वाचा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2024 2:47 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
18 की 80, कोणत्या वयातील महिला असतात सर्वांत उत्साही? 99% पुरूषांना माहित नाही उत्तर